∆ भोकर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या भोकर तालुका उपाध्यक्षपदी सावरगाव मेट येथील श्री प्रकाश बोंदीरवाड यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे स्वागत बोंदीरवाड मित्रमंडळी कडुन करण्यात आले आहे.
भोकर येथील शासकीय विश्रामगृहात दि. १४ फेब्रुवारी रोज बुधवारी दुपारी ठिक २ वाजता प्रकाश बोंदीरवाड मेट सावरगावकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भोकर तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा मित्र मंडळ व गोल्ला गोलेवार समाजाकडून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.गोल्ला गोलेवार समाजाचे जेष्ठ नेते नरसय्या मेंडेवाड दिवशीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी अनेकांनी अभिनंदन पर मत व्यक्त केले.या सत्कार बैठकीस सावरगावचे उपसरपंच,माली पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष उत्तम कसबे, उपाध्यक्ष दत्ता बोईनवाड, साहेब पाटील, रमेश पोलकमवार, विठ्ठल देवोड,रामलु उरुडवाड,हनमनलु ,राजेश बुदलोड आदी जन उपस्थित होते.