प्रतिनिधी/ माली पाटील
∆ नांदेड जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशा मुळे चिलबिल सुरू असतानाच केंद्र सरकारकडुन केंद्रीय रस्ते विकास निधीतून भोकर तालुक्यातील तीन रस्त्यासाठी ५० कोटी निधी मंजूर करुन घेऊन पक्ष प्रवेश किती काळाची गरज आहे हे दाखवून दिले असल्यानचे जिल्ह्यात चर्चा होत आहे.
भोकर सभेचे माजी आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन धक्का दिला.यात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सैरवर झाले होते. भोकर विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्र्यांच्या भाजप पक्ष प्रवेशाने निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी बैठका घेऊन आम्ही साहेबा सोबत जाणार नाही.काॅंग्रेस पक्षा सोबत राहू पक्ष पुन्हा बळकट करण्यासाठी गाव निहाय बैठका घेण्यात येणार असल्याचे कार्यक्रम सुरु असताना माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी मात्र कोणतीही टिका टिप्पणी न करता विकास कामांची झलक दाखवत पक्ष प्रवेश कशासाठी केला हे आपल्या कामातून दाखवुन दिले. केंद्र सरकारच्या रस्ते विकास निधीतून राज्यातील ८१ रस्ते विकास कामासाठी १ हजार ६०० कोटी निधी सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात भोकर विधानसभा मतदारसंघातील किनी ते पाळज साठी घाट सुधारणा सह १५ कोटी व इतर दोन रस्त्यासाठी ३५ कोटी रुपय मंजुर करुन घेतले आहे. या साठी अशोक चव्हाण हे काम करुन घेण्यासाठी अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील होते.त्यांच्या या प्रयत्नांना भाजपने साथ दिल्याने त्यांच्या कार्यकर्त्यात चांगला पायगुण म्हणत तर विरोधक मात्र महाविकास आघाडीच्या काळातील अडवलेली कामे असुन ती फक्त मोकळीक करत असल्याचे सांगत आहेत.विषेश म्हणजे किनी-पाळज या रस्त्यावरील वळण घाट करुन पाळज पासुन ते किनी येथील भुरभुशी रस्त्यापर्यंत रस्ता करण्याची मागणी शिवसैनीकानी वेळोवेळी अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली होती. हा रस्ता मंजूर झाल्याने किनी येथील गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.