प्रतिनिधी / माली पाटील
∆ भोकर तालुका म्हणजे डोंगराळ भाग अशा या तालुक्यात गत 45 वर्षांपूर्वी शिक्षणाची दूर अवस्था होती,हेच हेरुन माजी आमदार कै.बाबासाहेब देशमुख गोरठेकर यांनी भोकर शहरात शिक्षणाचा एक रोपट लावलं हे रोपट शहरी व ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वटवृक्षात रूपांतर होऊन शिक्षणाचा माहेर झालं. या रुपांतरात अनेक लोकांचे योगदान व सहकार्य लाभले. त्या माजी शिक्षक, संस्था सामाजिक व्यक्ती, पत्रकार अशा समाजातील घटकाचा शाहू परिवाराच्या वतीने आभार व कृतज्ञ सोहळा शाहू विद्यालयात दि.१६ मार्च रोजी संपन्न झाला.
डोंगराळ भाग असलेल्या या तालुक्यात ग्रामीण भागातील लोकांना पुढील शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये म्हणून तालुक्याचे नेतृत्व करणारे माजी आमदार कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर यांनी भोकर येथे सन १९८३ साली शाळा सुरू केली. शिक्षणाची गुणवत्ता यासाठी शिक्षक मेहनत घेत शिक्षणाचा दर्जा सुधारक शिक्षक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या माहितीने आज शाहू परिवार शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेलं नाव झाले. या शाळेतून शिकून अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर गेले. आज शाहू विद्यालयाची वाटचाल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास हाच हेतू घेऊन चालू आहे. शैक्षणिक क्षेत्रात अव्वल स्थान सातत्याने राखणाऱ्या शाहू महाराज विद्यालयाने मुख्यमंत्री "माझी शाळा सुंदर शाळा" या गुणवत्ता क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या यशामध्ये शिक्षक, माजी शिक्षक, पालक, सामाजिक संस्था व पत्रकार यांचाही वाटा महत्त्वाचा राहिल्याने दि. १६ मार्च २०२४ रोजी शाहू परिवाराच्या वतीने शाहू विद्यालयात कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप वाघमारे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापक आबासाहेब देशमुख हे होते. व्यासपीठावर पत्रकार विठ्ठल फुलारी, पत्रकार बाबुराव पाटील, बी.आर पांचाळ, पालक प्रतिनिधी शिवानंद शिंदे, शिक्षणा धिकारी एम.जी वाघमारे, अनिल शिरसाट, सुभाष पाटील कोंडलवार, मोहन पाटील हसापूरकर, राजेश्वर रेड्डी लोकावाड,डॉ. किरण पांचाळ, डॉ. राम नाईक, आदिनाथ चिंताकुंटे, जखियोदिन शेख, पा.प्र. सोळंके आदीची उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून उपस्थिताना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी कळवणे यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शाहु विद्यालयाच्या शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.शाहु परिवाराने यावेळी पत्रकार गणपत मुसळे, उत्तम बाबळे, राजेश वाघमारे, सुधांशू कांबळे, उत्तम कसबे, जय भीम पाटील, सुभाष नाईक, सिद्धार्थ जाधव, गंगाधर पडोळे, राहुल कदम, दत्ता बैलवाड, अनिल डोईफोडे, शंकर कदम, रमाकांत जोशी, कैलास कानिंडे, सुभाष तेले, कदम पाटील ,संभाजी कदम, विठ्ठल पांचाळ सतीश भौवरे आदींचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राहुल जोंधळे तर आभार प्राचार्य संजय देशमुख सावंत यांनी केले.