भोकर येथे महाविकास आघाडीची बैठक संपन्न

    

        अब की बार भाजपा तडीपार चा निर्धार 

                ‌‌‌प्रतिनिधी /माली पाटील  

∆ लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुका संदर्भात चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक भोकर येथे बोलावण्यात आली असून या बैठकीला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला यात निवडणूका विषयी चर्चा झाली असून कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भोकर तालुक्यातुन मोठी आघाडी मिळवून देण्याचा निर्धार करण्यात आला. 

   लोकसभेचे पडघम वाजले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आपली विचारसरणी सोडुन भाजपात प्रवेश घेतला.अशात तालुक्यात काँग्रेस गळतीला लागली मग आता कसं असा प्रश्न उपस्थित असताना काँग्रेसचे गोविंद पा. कोंडलवाड, बाळासाहेब पा. रावनगावकर, प्रकाश देशमुख भोसीकर, निळकंठ वर्षेवार, तौफिक इनामदार,प्रताप पाटील महागावकर, तिरुपतरेड्डी मुत्यालवाड,आदी चिंताकुंटे सह असंख्यानी दंड थोपटून काँग्रेस पक्षाला जिवदान देण्यासाठी मैदानात उतरले आहेत.त्यांना साथ म्हणून अनेक सरपंच,माजी सरपंच, चेअरमन,महिला आघाडी,युवा कार्यकर्ते ही साथ देण्यास सरसावले आहेत.कोणी पक्ष सोडून गेल्याने वा पळवुन गेल्याने काही फरक पडणार नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष झुकणार नाही, ना थकणार नाही, ना संपणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते व कार्यकर्ते देत आहेत.अशातच लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने महाविकास आघाडीची बैठक काँग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद पाटील कोंडलवाड यांनी बोलवणली होती.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर है होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी सभापती प्रकाश देशमुख भोसीकर, राष्ट्रवादीचे दत्तात्रय पांचाळ, प्रमोद देशमुख, आनंदराव पाटील बोरगांवकर, शिवसेना तालुकाप्रमुख (उबाठा) आदी उपस्थित होते.या बैठकीत अनेकांनी विचार व्यक्त केले.तर काँग्रेसचे नेते तळ्यात मळ्यात तर नाहीत ना असा सुर बैठकीत निघाला तेंव्हा नेते मंडळी आम्ही काँग्रेस पक्षाशी ठाम असुन आमच्यात बेइमानी नाही असे सांगितले.सध्या भाजपच्या उमेदवारांविरुद्ध तालुक्यात वातावरण असुन मोदी लाट ओसरली आहे.याचा पुरेपूर फायदा घेऊन महा विकास आघाडीचा उमेदवार कोणी असो त्यास सर्वाधिक मतदान तालुक्यातुन देण्याचा संकल्प करण्यात आला. रिगल बार या बाजुस असलेल्या या काँग्रेस कार्यालयात झालेल्या बैठकीत 

    गोविंद गोड पाटील, बाळासाहेब रावनगावकर, प्रकाश देशमुख भोसीकर मार्गदर्शन करताना 

शिवाजी देवतुळे, शिवाजी पा.लगळुदकर,आनंतवाड गुरूजी, राॅकाचे उमेश पा.कापसे, शिवसेनेचे जिल्हा उप -संघटक  सुभाष नाईक किनीकर, चेअरमन गंगाधर महादावाड,शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार, सेनेचे सुनील जाधव, दिव्यांग सेना प्रमुख विठ्ठल देवड, राजु पोगरे,मारोती पवार,मनोहर साखरे, गणेश आरलवाड, रमेश महागावकर, साहेबराव वाकोडे सर्व शिवसेनेचे, पत्रकार संघाचे अध्यक्ष उत्तम कसबे, पत्रकार विठ्ठल फुलारी, पत्रकार बि.आर.पांचाळ, पत्रकार अनिल डोईफोडे,दिवशी बु.सरपंच नितीन चौरेकर, दत्तागौड सुदनवार,माजी सरपंच माधव नागमोड, रविंद्ररेड्डी बोंतलवाड,माजी सरपंच साईनाथ याटेवाड, यशवंत किसवे,गिरीश पाटील, आदिनाथ चिंताकुंटे, महिला आघाडीच्या कमलताई नर्तावार, सुरेखा माळे, अनिता साबळे, आशु इनामदार, शफी इनामदार, नवीन तळेगावकर, राजू चव्हाण, लक्ष्मण डोंगरे, गजराम सुरोड, वाडीचे रामराव पाटील, शिवाजी टिकेकर, शंकर अक्कलवाड, दत्ता पोटपेलवाड सह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.यानंतर काँग्रेस शहराध्यक्ष तौफिक इनामदार यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post