प्रतिनिधी / माली पाटील
∆ भोकर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानासाठी येणारे भारत सरकारचे रेव्हेन्यू आयुक्त समीर वानखेडे हे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असुन भोकर व परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग नोंदवावा असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले असुन यासाठी नागेश माने व बालाजी वरवटे यांच्याकडे संपर्क साधावा.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान देण्यासाठी आयएएस २००८ च्या बॅचचे IRS ऑफिसर समीर वानखेडे हे दि.२ जुन रोजी भोकर येथे येत आहेत.दुपारी २ वाजता व्याख्यान मोंढा भागातील मार्केट यार्ड मध्ये हा कार्यक्रम होणार असून याच दिनाचे औचित्य साधून भोकर येथील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी संधी असुन त्यांच्या ज्ञानात भर पडावे व अभ्यास अन् परिक्षा या संदर्भात मार्गदर्शन आयुक्त समीर वानखेडे हे करणार आहेत. तरी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी यांचा लाभ घ्यावा असे अहिल्यादेवी होळकर जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.तसेच विद्यार्थ्यांनी नागेश माने व बालाजी वरवटे धावरीकर यांच्याशी संपर्क साधावा.