प्रतिनिधी / माली पाटील
∆ राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २ मे रोजी भोकर येथे होणाऱ्या २९९ जयंती निमित्त कार्यक्रमास उपस्थित रहावे.यासाठी दि.२० मे पासून तालुक्यातील मौजे बेंबर,हाळदा,ईळेगाव,डौर,बेंद्री, पिंपळढव,रहाटी,नांदा (म्है.प), खडकी आदी गावांत जयंती मंडळाच्या वतीने घोंगडी बैठका घेण्यात आल्या असून या बैठकीत उपस्थित धनगर बांधवांना तरुण व्याख्याते बालाजी वरवटे, कार्याध्यक्ष नागोराव शेंडगे बापू, सेनेचे सुभाष नाईक किनीकर यांनी मार्गदर्शन करुन दि.२ मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण व आवाहन करण्यांत आले.यावेळी मंडळाचे सचिव राजेश हाके, उपाध्यक्ष सुनील शिंदे, पत्रकार उत्तम कसबे,निकेश सुर्यवंशी आदी उपस्थित होते.