प्रतिनिधी/ माली पाटील
∆ नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससी परीक्षेत दिवशी बु. येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा बालाजी मेंडेवाड हा जलसंधारण अधिकारी म्हणून यशस्वी झाला असल्याने त्यांचा लोकनेते नागनाथ घिसेवाड यांनी त्यांचा शाल देऊन सत्कार केला.त्याच्या यशाचे परिसरात कौतुक होत आहे.
भोकर तालुक्यातील मौजे दिवशी बु.येथील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा व सर्व सामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढणारे नरसय्या मेंडेवाड यांचे सुपुत्र बालाजी मेंडेवाड हा नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मध्ये जलसंधारण अधिकारी या पदासाठी निवड झाली आहे.अत्यंत हलाखी व गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत जिवनात यशस्वी भरारी घेतली असल्याने त्याच्या कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.बालाजी मेंडेवाड यांची जलसंधारण अधिकारी पदी निवड झाल्याचे समजताच माजी सभापती लोकनेते नागनाथ घिसेवाड यांनी मौजे दिवशी बु.येथे जाऊन बालाजी मेडेंवाड व त्यांचे वडील नरसय्या मेंडेवाड आणि त्यांच्या पत्नीचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी जेष्ठ नेते नागोराव शेंडगे बापू, प्रकाश बोंदीरवाड, पत्रकार उत्तम कसबे,संजय बोईनवाड, शंकर काटेवाड,नायण पाटील,राजु अंचगुडे, माणिक भरडेवार, बालाजी ममईवाड,पिंटु माळवंतकर, माधव बोईनवाड,रेड्डी बोईनवाड,श्रीकर पांचाळ आदी उपस्थित होते.