शिक्षकांच्या अकार्यक्षम पणामुळे राम भरोसेने मौजे नारवट येथील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर


                   प्रतीनिधी / माली पाटील

∆ शिक्षणाची ऐशी की तैशी म्हणत शिक्षणाचा खेळ मांडून विद्यार्थीच्या कांक्षा व आकांक्षा वर पाणी फेरणार्या व शाळेत गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकामुळे शाळाच बंद होण्याची नारवट गावावर नामुष्की ओढवते कि काय असी स्थिती आहे.गत तिन वर्षापासुन वारंवार निवेदणे व पाठपुरावा करुन ही नैतीकतेचे धडे देणार्या सिईओ व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष ! मग आता कोणाच्या दारात जावे असा यक्ष प्रश्न शाळा शिकवणार्या पालकाला पडला आहे. आता तरी शिक्षण विभागाचे अधिकारी लक्ष देऊन त्या शिक्षकांना पाठीसी न घालता येथे नविन शिक्षक बदलुन देतील अशी अपेक्षा पालक व गावकर्यानी केली आहे.

  भोकर तालुक्यातील व भोकर शहराजवळ ३ कि.मी अंतरावर मौजे नारवट हे गाव आहे. या गावात जि.प. प्राथमिक पर्यंत शाळा आहे.या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी १.रेणेवाड २. बसीनलोड हे दोन शिक्षक आहेत. परंतु ते दोन अकार्यक्षम शिक्षक शाळेकडे दुर्लक्ष करत नशेबाजीत राहत  शाळेचे तिन तेरा वाजवित असल्याचे गावकर्याचे म्हणणे आहे.या संबधी गावकरी आणी ग्राम पंचातच्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, शिक्षणाधिकारी,गट शिक्षणाधिकारी यांना गत तिन वर्षापासुन विनंती निवेदने देत आहेत. पण कोणीही याकडे लक्ष न देता उलट त्या अकार्यक्षम शिक्षकांना पाठीसी घालत असल्याची गावकरी व पालकांची तक्रार आहे. मौजे नारवटची शाळा सुंदर शाळा असुन या शाळेमध्ये भौतीक दृष्ट्या डिजीटल वर्ग अन्य क्रिडांगण अशा सर्व सुख सुविधा उपल्बध असुनही   त्याचा उपयोग विद्यार्थ्याना होत नाही.शाळेत असलेल्या अकार्यक्षम व गैरवर्तन करणार्या शिक्षकाचे लक्ष विद्याथ्याच्या शिक्षणाकडे मुळीच नाही.त्यामुळे या शाळेत शिक्षण घेणार्या मुलांचे शिक्षण धोक्यात आले असुन शाळेची विद्यार्थ्याची पट संख्या कमी होत आहे.त्यामुळे अकार्यक्षम शिक्षक श्री रेणेवाड व श्री बसीनलोड या शिक्षकांची येथुन बदली करावी व कार्यक्षम आणी शिक्षणप्रेमी शिक्षकांची नेमणुक करुन अंधारकामय होणार्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन दिलासा द्यावा अन्यथा अशा अकार्यक्षम शिक्षकामुळे शाळा बंद पडण्याची शक्यता असल्याने शिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शिक्षक बदलुन द्यावे असी मागणी पालकवर्ग,सरपंच रामदास जोंधळे, उपसरपंच एन.झाडे व अध्यक्ष शालेय शिक्षण समिती यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post