भोकर येथील अपघातात मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांना काँग्रेस नेते दादाराव पा.ढगे यांनी ५१ हजार


प्रतिनिधी / माली पाटील 

∆ भोकर- हिमायतनगर रोडवरील टाकराळा येथे अपघात होऊन मृत्त पावलेल्या कुटुंबियांना भोकर विधानसभा सभा मतदारसंघाचे काँग्रेसचे नेते दादाराव पा. ढगे यांनी दिनांक २८ जुलै २०२४ रोजी ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत करत त्या कुटुंबाचे घरी जाऊन सांत्वन केले.

भोकर येथील आजोबा व नातु हे हिमायतनगर तालुक्यातील सोनारी येथे कंदोरीचे पाहुणचार करुन दोघे भोकर कडे परत येण्यासाठी टाकराळा जवळील रस्त्यावर उभे असताना  भरधाव वेगात जाणाऱ्या मोटार सायकल स्वाराने भोकर शहरातील वडार गल्ली येथे  राहणारे स्व. खाजा मिया हसन साहब पठाण  व त्यांचा नातू सलमान अमजद यांना उडविले होते. यात या आजोबा नातवाचा दिनांक ४ मे २०२४ रोजी मृत्यू झाला. या अपघातामुळे घरातील करता धरता व्यक्ती , कुटुंबाचा आधार  गेल्याने कुटुंब उघड्यावर पडले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असल्याची माहिती समजताच   भोकर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांनी दिनांक २८ जुलै रोजी या कुटुंबियांच्या घरी जाऊन भेट घेत त्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांनी ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत करून कुटुंबियांना जगण्याचा आधार दिला.यावेळी दादाराव पाटील ढगे,भुजंगराव शाहुजी ढगे, जीवन नाईक चिदगिरीकर, संजय मेंदेवाड, गोपीराज पवार, आनंद मगरे, बालाजी राव नागेलिकर, ओंकार ढगे, मोहनराव, हणमंत राव तोटेवाड आदी कार्यकर्त्यांसह  गोवर्धन जाधव, नीलकंठ वर्षेवार, व्यंकट मेटकर, मैनोद्दीन करखेलीकर, मिलिंद जाधव, वहाब करखेलीकर आशु इनामदार, आदींसह वार्डातील नागरिक उपस्थित होते. 

   भोकर विधानसभा मतदार संघातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे हे आपल्या मतदार संघात सामाजिक कार्यात नेहमीच हिरहिरीने सहभाग घेत असतात. गोरगरीब महिला ही आपली माता भगिनी समजून त्यांची सेवा करणे त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे त्यांचा सन्मान म्हणजे आपला सन्मान हा उदात हेतू मनात बाळगून त्यांचा आदर सत्कार करण्यासाठी पसारातील गोरगरीब महिलांना आर्थिक मदत   म्हणून पाच हजार रुपये रोख रक्कम व साडी चोळी करून त्यांचा आदर सत्कार केला. यांच्या कार्याची पावती म्हणून की काय यांना भोकर विधानसभा मतदार संघात जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनतेच्या या प्रतिसादामुळे सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांनी नेहमीच काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय असणारी उच्य शिक्षित कन्या इंजि. दामिनीताई दादाराव ढगे पाटील यांना आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भोकर विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. यांच अनुषंगाने भोकर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे भावी व इच्छुक उमेदवार इंजि. दामिनीताई दादाराव ढगे पाटील यांच्या वतिने अर्धापूर, मुदखेड भोकर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या पहिली ते पाचवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या पेन व शालेय शाहित्य वाटप करण्यात आले आहे.

यावेळी दादाराव पाटील ढगे व यांची कन्या इंजि. दामिनीताई ढगे पाटील यांना ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post