प्रतिनिधी / माली पाटील
∆ भोकर तालुक्यातील प्रशासनातील अधिकाऱ्यांना सर्व सामान्य जनतेच्या समस्या कडे किंवा तक्रारी कडे लक्ष देण्यास वेळच दिसत नाही.भोकर तहसील कार्यालया अंतर्गत दोन महा-ई-सेवा केंद्र आहेत.हे दोन्ही केंद्र दुसऱ्या मजल्यावर सजलेले आहेत.या सेतु सुविधा केंद्रात जाणे म्हणजे अपंग,म्हातारे, वयोवृध्द महिला , लहान मुले अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे.या बाबत गेल्या अनेक वर्षापासून तहसीलदार कडे तक्रारी असून अशा अनेक तक्रारी या कार्यालयात धुळखात पडुन आहेत.पण प्रशासनाने कोणतीही हालचाल केली नसल्याचे दिसून येते. भोकर तहसील कार्यालयाच्या जवळच दोन महा-ई-सेवा केंद्र स्थापित असून दोन्ही सेवा केंद्र हे वरच्या मजल्यावर अतिशय अरुंद लोखंडी शिड्या असल्याने या ठिकाणी दिव्यांग,वृद्ध,जेष्ठ नागरिक यांना वर चढून सुविधा केंद्रात जाताच येत नाही.म्हणुन सदरील सेतु केंद्र जनतेला सुरक्षीत वाटेल अशा ठिकाणी सुरू करुन सर्व सामान्य माणसाला दिलासा द्यावा अन्यथा दि १४ ऑगष्ट रोजी पासून प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने व ज्येष्ठांना व दिव्यांगाना सुलभ असे सुविधा केंद्र मिळेपर्यंत आमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आला आहे.
भोकर शहरात जनतेच्या सेवेसाठी शासनाने सुविधा केंद्र उपलब्ध करून दिली आहे.पण हे सुविधा केंद्र असुन अडचण नसुन खोळंबा झाला आहे. या सुविधा केंद्राच्या दर्शनी भागावर दर पत्रक लावलेले नाही. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगानां वर चढून सुविधा केंद्रात जाता येत नसल्यामुळे. त्यांचे कामे करण्यासाठी त्या ठिकाणी दलाल उपलब्ध आहेत. अशा कामांसाठी सामान्य जनतेची दलालांकडून आर्थिक पिळवणूक केल्या जात आहे.या बाबत गेल्या अनेक वर्षापासून अनेक सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, वृद्ध, दिव्यांग, यांनी भोकर तहसील कार्यालयास शेकडो वेळा लेखी व तोंडी तक्रारी दिल्या परंतु सदरील सेतू सुविधा केंद्र हे जागचे का हालले नाही.झालेल्या तक्रारींचे काय निराकरण झाले यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काही कार्यवाही केली की नाही या बाबद, कोणी काही सांगायला तयार नाही. या पूर्वी अनेक वेळा ज्येष्ठ नागरिक वृद्ध व्यक्ती व अनेक दिव्यांग बांधवांनी तोंडी तक्रारी केल्या परंतु काहीच मार्ग निघत नसल्याने ,प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेश चंद्रे यांनी उपविभागीय अधिकारी भोकर यांना निवेदन देऊन तात्काळ जेष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींसाठी सुलभ असे महा-ई-सेवा केंद्र उपलब्ध करून द्यावे अन्यथा दिनांक १४ ऑगस्ट २०२४ पासून प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने लोकशाही पद्धतीने दिव्यांग व जेष्ठांना सुलभ असे ई-सेवा केंद्र मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने भोकर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे . या निवेदनावर जिल्हा संपर्कप्रमुख राजू इबितवार, एम.डी सोनकांबळे, बालाजी कोकणे , दत्ता बोईनवाड, विठ्ठल जुजूकर, खंडू दाढेराव, परमेश्वर गायकवाड, अमोल भालेराव या दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.