भोकर तालुका सरपंच संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी मारोती पा.भोंबे तर उपाध्यक्ष म्हणून राघोबा पा.सोळंखे आणि सचिव पदी मोहन राठोड यांची निवड



                प्रतिनिधी /माली पाटील 

• भोकर तालुक्यातील सरपंच संखटनेची बैठक संपन्न होऊन यात अध्यक्षपदी मारोतराव पा.भोंबे यांची तर उपाध्यक्ष म्हणून राघोबा पा.सोळंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सदरील संघटना भाजप प्रणित असल्याचे सांगितले जाते.

      भोकर तालुका  सरपंच संघटनेची वाताहत झाली होती पण मागील कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती.त्यानंतर दि.१९ ऑगस्ट २०२४ रोजी हाँटेल गणराज रिसार्ट येथे बैठक घेण्यात आली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दिलीपराव देशमुख सोमठाणकर हे होते. 

यावेळी सर्व सरपंचांच्या सहमतीने पिंपळढव येथील मारोतराव पा.भोंबे यांची अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून राघोबा पा.सोळंके,तर सचिव मोहन राठोड सहसचिव दिलीप यायभोळे तर सल्लागार म्हणून सुरेश पा.कल्याणकर यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.या निवड बैठकीला सभापती जगदीश पा. भोसीकर,भाजपा अध्यक्ष गणेश पा.कापसे, किशोर पा.लगळुदकर, बालाजी शानमवाड,उज्वल केसराळे,केशव पा.पोमनाळकर,अत्रीक पा.मुंगल,राजु अंगरवाड,कैलास पाटील,धनराज पा. हस्सापुरकर, सुरेश डुरे, मारोती अंगरवाड, चंद्रकांत नागमोड, भालेराव लामकनीकर आदींची उपस्थिती होती.बिनविरोध निवड झालेल्या भाजप प्रणित सरपंच संघटनेच्या कार्यकारिणी मंडळाचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


Post a Comment

Previous Post Next Post