प्रतिनिधी / माली पाटील
सातत्याने नापीक व कर्जबाजारी झालेल्या तरुण शेतकऱ्यांनी कंटाळून घरात दोरीने गळफास लावून आत्महत्या केली असल्याची घटना दि.७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे.
किनी व परिसरात आत्महत्या करण्याचे जणु सत्रच चालु आहे की काय असे दिसते. परवाच किनी येथील नरेशरेड्डी सुरकुंटवाड नामक तरुण शेतकऱ्यांनी कर्ज बाजारीस कंटाळून आत्महत्या केली होती. तर लगेच दोन दिवसाला म्हणजे दि.७ ऑगस्ट २०२४ रोजी किनी येथील लक्ष्मण धर्मन्ना कडकुंटवाड पद्मशाली वय ३८ या तरुण शेतकऱ्यांनी सततच्या नापीक आणि बॅकेतील कर्ज न फेडता येत असल्याने अखेर त्याने दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घरातील सर्व शेतात गेल्याचे पाहून त्याने घरातील तुळईला दोरीचा फास घालुन आत्महत्या केली आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कडकुंटवाड परिवार उघडे पडले आहे. कै.लक्ष्मण कडकुंटवाड याच्या पश्चात आई दोन मला एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे.