प्रतिनिधी / माली पाटील
• ओबीसी आरक्षण बचाव चळवळीचे योद्धे प्रा.लक्ष्मण हाके यांचा बहुजन ओबीसी नेते नागनाथ घिसेवाड यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
भोकर येथे १८ ऑगस्ट रोजी ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यास प्रा.लक्ष्मण हाके हे प्रमुख वक्ते म्हणून हजर होते.सभा संपल्यानंतर भोकर विधानसभा मतदारसंघाचे बहुजन ओबीसी नेते नागनाथ घिसेवाड यांच्या संपर्क कार्यालयात प्रा.लक्ष्मण हाके यांनी सदिच्छा भेट दिली.तेव्हा लोकनेते नागनाथ घिसेवाड यांनी त्यांचा व नागनाथ वाघमारे यांचा पुष्पहार शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी नागनाथ घीसेवाड यांनी भोकर विधानसभा मतदारसंघात तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवून ओबीसी बहुजन समाजाची वज्र मुठ बांधली होती.त्यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला पुन्हा नव्या जोमाने ते ताकदीनिशी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयार आहेत. सर्वसामान्य लोकांची इच्छा देखील आहे असे मत उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावेळी मार्गदर्शन करताना बहुजनांच्या ओबीसींच्या विचारांची माणसं निवडणुकीसाठी आता सज्ज झाली पाहिजेत आणि सर्वांनी एकजुटीने त्यांना मदत केली पाहिजे असे मत प्रा.लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले. यावेळी नागनाथराव घिसेवाड,नामदेवराव आयलवाड, ओबीसी नेते नागोराव शेंडगे, पत्रकार बी.आर.पांचाळ, शिवसेनेचे जिल्हा संघटक सुभाष नाईक ,ज्येष्ठ पत्रकार एल.ए .हिरे,बालाजी राठोड,ऍड.परमेश्वर पांचाळ, दत्ता बोईनवाड, गितेश बोटलेवाड, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाउपाध्यक्ष प्रकाश बोंदीरवाड,भोकर रूरल कंपनी अध्यक्ष माधव सलगरे, युवा सेनेचे गणेश आरलवाड , उत्तम कसबे,सर्कल प्रमुख गोविंद गिरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.