१७ सप्टेंबर पर्यंत घोषणा करा अन्यथा धनगर समाज..... ------------------------------------------------------------------
वृताकंन - संपादक
• मराठवाडा मुक्ती संग्राम दिन १७ सप्टेंबर रोजी असुन याच मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी न भुतो न भविष्य असी मुघलांना जेरीस आणणारी तब्बल एक महिना लढाई लढलेले आद्य क्रांतिवीर राजे नवसाजी नाईक यांच्या कार्याचा भान ठेवून सरकारने धनगर समाज मागणी केलेल्या ईसापुर धरणाच्या जलाशयाला त्यांचं नाव देतो म्हणून मुग गिळत बसलेले सरकार अद्याप दिले नाही.त्यामुळे १७ सप्टेंबर या मुहूर्तावर आद्य क्रांतिवीर राजे नवसाजी नाईक यांचे नाव द्यावे अशी मागणी तमाम धनगर समाज करत आहे.
मराठवाडा परिसरातील हदगाव तालुक्यातील नाव्हा गाव आहे.या गावाला संघर्षाची कहाणी आहे.या मातीत इंग्रज आणि मुघलासी अत्यंत भयंकार लढाई तब्बल एक महिना हौसाजी व नवसाजी नाईक या भावंडांनी केली.या मराठवाडा भागातील लोकांसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. पण शासनाला यांचे भान राहिले नाही.तसेच विदर्भ भागातील ईसापुर येथे मोठे धरण बांधण्यात आले.या धरणात धनगर (हटकर) जमातीचे शेकडो गावे बुडीत झाली.शेती गेली.या धरणात मोठमोठी हटकर घराने,त्यांचे वाडे हजारो एकर जमीन गेली. गेल्या कित्येक वर्षांपासून पैनगंगा नदी खोऱ्यातील इतिहास प्रेमी तथा राजे नोवसाजी नाईक प्रेमी लोकांमधून पैनगंगेच्या नदीवर असलेल्या ईसापुर धरणाच्या जलाशयाला आद्य क्रांतिवीर राजे नोवसाजी नाईक जलाशय नाव देण्यात यावे अशी प्रखर मागणी केली आहे. त्यामुळे या परिसरातील काही लोकप्रतिनिधींनी त्यासाठी शासनाला पत्रही दिलेत. परंतु फक्त पत्राने कामे होत नसतात. आपल्या घरचं काम म्हणून केलं तर ते होतं. लोकप्रतिनिधींमध्येही या बाबतीत उदासिनता दिसून येते. याला अपवाद दि. ४ मार्च २०२२ रोजी आ. श्री गोपीचंद पडळकर साहेब यांनी विधान परिषद सभागृहात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दि.११ मे २०२३ (तब्बल एक वर्ष दोन महिन्यांनी उशीरा) चे पत्र देऊन वेळ मारून नेली. श्रीमंत भुषण सिंह राजे होळकर यांनीही या विषयाचा पाठपुरावा केला खरा परंतु ते सत्तेत नसल्याने अडचणी आल्या. कारण इतिहास पुरुषांच्या यादीत आमच्या परिसराशी संबंध नसलेल्यांना आद्यक्रांतिवीर म्हणून आम्ही गौरवत बसतो. परंतु या मातीत जन्मलेला, वाढलेला आणि या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी , इथल्या जनतेसाठी पराक्रमाची पराकाष्ठा केलेला वीरपुरुष कधी सांगितला नाही. ठीक आहे नका सांगू. परंतु ज्या योद्ध्यांनी या भूमीसाठी रक्त सांडले त्यांचा विसर येणाऱ्या आमच्या पिढ्यांना पडू नये यासाठी तरी सरकारने त्यांची स्मृती आम्हाला जपता यावी म्हणून 'ईसापुर धरणाच्या जलाशयास आद्य क्रांतिवीर राजे नोवसाजी नाईक यांचे नाव द्यावे.' विद्यमान सरकारला धनगरांची मते चालतात परंतु त्यांच्या इतिहास पुरुषांची स्मृति जिवंत राहावी असे वाटत नाही. असे खेदाने म्हणावेसे वाटते. जनभावनेचा आदर राखणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. म्हणूनच धनगर समाज संतप्त होत सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल करत आहे.त्यामुळे सरकारने १७ सप्टेंबर २०२४ च्या आत जलाशयाला नाईकांचे नाव घोषित करावे असी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नांदेड जिल्हा संघटक तथा यशवंत सेनेचे मराठवाडा संघटक सुभाष नाईक किनीकर यांनी केली आहे.