प्रतिनिधी / माली पाटील
∆ ना कायद्याचा दाहक, ना जनाची भिती म्हणूनच वाढतेय वासनांधाची भुक असाच प्रकार मौजे पाळज या पवित्र तिर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणी दोन वासनांध तरुणांनी सोनारी तांडा येथील एका १५ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन फरार झाल्याची घटना दि.१४ सप्टेंबर रोजी रात्री ९:३० च्या सुमारास घडली असून या प्रकरणी दि. १५ रोजी भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या गणपती उत्सव मोठ्या प्रमाणावर सुरू असुन यातच मौजे पाळज येथील गणपतीची महीमा भक्तांना भाळत असल्याने मौजे सोनारी तांडा येथील लोकांनी टेम्पो घेऊन ठिक सात वाजता पाळजला निघाले याच टेम्पोत सोनारी तांडा कुटंब पण निघाले.पाळज येथे मोठी गर्दी होती.त्यामुळे रांगेतुन पिडीत मुलगी व तिचे आई वडील दर्शनासाठी उभे होते.पिडीत मुली आई वडीलांच्या बरीच पूढे होती त्यामुळे तिने दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर येऊन आई-वडिलांची वाट पाहत बसली होती.तेवढ्या सोनारी तांडा येथीलच व घराशेजारी असणारा शंकर उर्फ कोंडीबा उत्तम पवार यांने तिच्या जवळ येऊन तिला आकाश पाळण्यात बसु असे म्हणाला तेव्हा ती पिडीता नकार दिली असता शंकर याने तिचा हात धरुन तिला बळजबरीने मित्राच्या टेम्पो कडे नेले.आदीच टेम्पो जवळ मित्र कुणाल राठोड तेथे उभा होता.टेम्पोजवळ येताच दोघांनी तिला टेम्पोत उचलुन टाकले अन् तिच्या सोबत अश्लील चाळे करू लागले.तेंव्हा ती पिडीता मला जाऊ द्या म्हणून विनवणी करत ओरडत होती.तेव्हा तिचे तोंड दाबून तिचे कपडे काढून दोघानी आळीपाळीने तिच्यावर दुष्कर्म केले. तेवढ्यात तिच्या आई वडीलांनी दर्शन संपवून बाहेर आले. पण मुलगी दिसत नसल्याने ते शोधु लागले तेंव्हा मुलगी टेम्पो समोर दिसली.तत्पुर्वी त्या दोघांनी तिच्यावर बलत्कार केले अन् आई वडील टेम्पो कडे येताना तेव्हा दोघांनी तिला तु कोणाला सांगलीस तर तुला मारुण टाकतो म्हणून धमकी दिली अन् पळुन गेले.तेव्हा रात्रीचे ९:३० ची वेळ होती. भिती पोटी ती पिडीता त्यावेळी काही ही सांगितली नाही. त्यानंतर ते कुटुंब गावाकडे असता त्या पिडीताचे पोट दुखायला लागले.तेव्हा ती पिडीता काकीला झालेली घटना सांगितली.तेव्हा काकुने घरातील सर्व मंडळीला ही सांगली तेव्हा कुटुंब स्तब्ध झाले.यानंतर त्या पिडीताला दवाखान्यात उपचार केले.दि १५ रोजी या कुटुबांने भोकर पोलीस ठाणे गाठून पोलीसांना झालेली घटना पिडीताने सांगितली.यावरुन भोकर पोलिसांनी आरोपी शंकर उर्फ कोंडीबा उत्तम पवार व कुणाल राठोड यांच्या विरोधात गु. र.नं ३४३/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ७० (२),१३८,३५१ (२) (३) (५) व सह कलम ४,८,१२ बालक लैंगिक अपराध संरक्षण कायदा " पोस्को" गुन्हा दाखल करण्यात आला.या गुन्हाचा तपास पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड हे करीत आहेत.