सखा मित्रच साथ सोडल्याने खा.अशोक चव्हाणांच्या जिव्हारी....
• नांदेड जिल्ह्यात राजकीय धुव्रीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू असुन जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का देत दोन माजी मंत्री व एक माजी आमदार सह अनेक पदाधिकारी मुंबई येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याने माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोक चव्हाण यांना मोठा धक्का मानला जात असुन यातील एका जिवलग सखा मित्र सोडुन गेल्याने खा. अशोक चव्हाण यांच्या जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे.
भाजपचे माजी राज्यमंत्री तथा चव्हाणाचे दाजी भास्कर राव पाटील खतगावकर,माजी मंत्री डि.पी.सावंत,माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हा परिषद सदस्या डॉ.मिनल खतगावकर सह अनेकांनी दि.२० सप्टेंबर रोजी मुंबई येथील काँग्रेस कार्यालयात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला.
यात खा.अशोक चव्हाण यांचे मेव्हणे माजी मंत्री भास्कर राव पाटील खतगावकर व माजी मंत्री डी.पी.सावंत यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने अनेकांची भुवया उंचावल्या आहेत.सध्या निवडणुकीचा काळ असुन जो तो स्वतःसाठी आणि
नातेवाईकांना भविष्यासाठी आपले वारस ठरवण्या करीता धावपळ सुरू आहे.ना तत्व, ना निष्ठा,ना निष्ठावंत हे काहीच राहिले नसुन कोठे आपला निभाव लागतो, कसं पक्षाचे तिकीट मिळते राजकारणात आपले वारस कसे पुढे न्यावे हाच हेतू घेऊन राजकारणी इकडुन तिकडे पळत आहेत.यांना जनतेची,विकासाची काहीच देण घेण नाही.सबकुछ अलक निरंजन !