प्रतिनिधी/ माली पाटील
∆ भोकर तालुक्यातील मौजे हाडोळी येथील सुधाकर तुकाराम पुलकंटे यांच्या वडिलोपार्जित असलेले घर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी नमुना मध्ये खाडाखोड करून रस्त्यासहीत जागा हडप केली असून याची चौकशी करुन न्याय द्यावा यासाठी भोकर तहसील कार्यालय समोर अमरण उपोशनास बसले आहेत.
भोकर तालुक्यात हाडोळी हे स्वच्छ व सुंदर असे राज्य स्तरीय पुरस्कार मिळालेले गाव.या गावात मात्र एका शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध उपोशनास बसण्याची पाळी आली आहे.येथील सुधाकर तुकाराम पुलकंटे यांचे हाडोळी येथे जुना वाडा आहे.या वडिलो पार्जित वाड्याचा घर मालमत्ता क्र.२२३ जिचे क्षेत्रफळ अंदाजे २४×२५ जागा आहे.येथील शेजारी बापुराव पाटील जाधव यांनी माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मी अज्ञान असताना न.नं ८ मालमत्ता मध्ये बदल करून जागा हडप केली आहे.व रस्ता सुद्धा हडप बापुराव पा.जाधव यांनी केल्यांचे दिसते.त्यामुळे त्यांच्या नुसार माझे घर पाडुन तर देण्याची वेळ आली आहे.सन२००१ मध्ये ग्रा.पं न.८ वर घोळ केले आहे.या संदर्भात मी वारंवार सरकार कडे तक्रार केली उपोशन ही केलं पण मला समजुन सांगुन न्याय देऊ असे सांगितले.तसेच सन २००१ च्या पुर्वीचे न.नं ८ ग्राम पंचायत कडे उपलब्ध नाही.ते गायब केल्याची शक्यता असल्याने मला न्याय मिळावा यासाठी मी दि.१ आक्टोबंर पासुन तहसील कार्यालय समोर अमरण उपोशनास बसलो आहे.जर मला न्याय मागताना उपोशन दरम्यान माझ्या जीवाचे काही बरे वाईट झा्ल्यास यांची जवाबदारी प्रशासनावर राहील असे गटविकास अधिकारी व तहसीलदार सरपंच, ग्राम सेवक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.