माहुर येथील मेळाव्यास गोल्ला -गोल्लेवार यादव समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे -प्रदेशाध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड


• गोल्ला गोलेवार यादव महासंघाच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणारा समाज मेळावा, समाज भूषण पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व व्यसन दहन कार्यक्रम ११ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रसंत गुरूवर्य श्री साईनाथ महाराज बितनाळकर यांचे आनंद दत्त धाम आश्रम श्रीक्षेत्र माहूर गढ येथे आयोजीत केला आहे.या कार्यक्रमास गोल्ला गोल्ला यादव समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड यांनी केले आहे.

सदरील कार्यक्रमात ५ वी, ८वी शिष्यवृत्ती, दहावी, बारावी मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व आयआयटी पात्र एमबीबीएस, एमडी- एमएस, व तसेच एमपीएससी, यूपीएससी, नेट-सेट पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार व सन २०२३-२४ मध्ये शासकीय निम शासकीय सेवेसाठी निवड झालेले अधिकारी - कर्मचारी यांचा सन्मान करण्यात येईल.तसेच कर्मचारी अधिकारी व विद्यार्थ्यांनी श्री अभिषेक बकेवाड मो. 94205 35658, श्री माधवराव वटपलवाड सर मो. 080559 27987, श्री अंबादास आटपलवाड सर मो . 86007 51337, श्री बालाजी शेणेवाड सर मो. 98347 72749 किंवा आपल्या तालुका अध्यक्ष यांचेकडे ९ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत संपर्क साधून नोंद करावी. सन २०२३-२४ या वर्षीचा समाज भूषण पुरस्कार जे सर्वोत्कृष्ट मानल्या जातो, समाजासाठी सतत कार्य करणाऱ्या ज्येष्ठ समाज सेवकास दिला जातो. तो समाज भूषण पुरस्कार या कार्यक्रमात दिला जाणार आहे.  सध्याच्या काळात काही व्यक्ती व्यसनाधीन होवुन जीवनाचा भ्रमनिरास करीत आहेत. त्यासाठी व्यसन मुक्तीचा संदेश जावा म्हणून व्यसनरुपी रावणाचा व्यसन दहन या कार्यक्रमाच्या दिवशी कऱण्यात येतो, तरी या कार्यक्रमास सर्व समाज बांधवानी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रांत अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड भोसीकर, महासचिव श्री एस.टी. गालेवाड,प्रांत कोष्यध्यक्ष  पी.पी.फांजेवाड,प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक पी.जी. रुद्रवाड सर, नांदेड जिल्हाध्यक्ष श्री रमेशजी बद्दीवार व श्री नागनाथ नियलवाड, प्रदेश कर्मचारी अध्यक्ष श्री अनुप आंनमवार, सचिव श्री संदेशजी कमठे, जिल्हा युवा अध्यक्ष श्री अभिषेकजी बकेवाड व सतिश शिंगेवाड, सुकानु समिती श्री व्ही. एन. नारवाड सर, श्री राजेन्नाजी आटपलवाड, श्री गोविंदराव वटपलवाड,  श्री प्रकाशराव करेवाड, श्री पी.जी. रूद्रवाड सर, डॉ. तुकाराम आऊलवार, श्री गंगाराम बैनमवाड, श्री गंगय्या सल्लावार, डॉ. श्री लक्ष्मणराव कोमलवाड, जि. सचिव श्री अशोक कासराळीकर, जि. कार्याध्यक्ष श्री रमेशजी रामपूरवार व श्री देवीदासजी बिबटवार, जि. उपाध्यक्ष श्री गंगाधर शिध्देवाड, श्री रामभाऊ वटपलवाड, जि. कोष्याध्येक्ष श्री तुकाराम कैलवाड, जि. संघटक श्री कैलाश आक्कमवाड, जि. सरचिटणीस श्री गोविंदराव भुसलवाड, कर्मचारी जि. अधक्ष श्री मारोतीराव झंपलवाड, कर्याध्यक्ष श्री अंबादासजी आटपलवाड, सचिव श्री रमेशजी राऊलवाड, मार्गदर्शक श्री बालाजीराव शेणेवाड, श्री परशूराम आक्कमवाड, श्रीहरी नागधरे, श्री राजेंद्र भुसलवाड, सायलूजी करेवाड, श्री विठ्ठलराव जकीलवाड, नांदेड ता. अध्यक्ष श्री एकनाथ बत्तलवाड, अर्धापूर  ता. अध्यक्ष श्री गंगाधरराव बकेवाड, हि.नगर ता. अध्यक्ष श्री सुभाषराव शिलेवाड, उमरी ता. अध्यक्ष श्री गणेशराव आणेमवाड, भोकर ता. अध्यक्ष श्री संतोष आक्केमवाड, नायगांव ता. अध्यक्ष श्री मधूकर घोसलवाड, धर्माबाद ता. अध्यक्ष श्री कैलाशजी चंदोड, हदगाव ता. अध्यक्ष श्री नवनाथजी बद्दरवाड, मुदखेड ता. अध्यक्ष श्री रामजी गवंडेवाड, मुडखेड शहर अध्यक्ष श्री प्रकाशराव बल्फेवाड, किनवट ता. अध्यक्ष श्री व्यंकट दोडलवार, बिलोली ता. अध्यक्ष श्री शंकरराव म्याकलवार, लोहा ता. अध्यक्ष श्री शिद्धेश्वर जकवाड, देगलुर ता. अध्यक्ष मारोती यंन्नलवार, मुखेड ता. अध्यक्ष श्री बालाजी बोईलवाड, कंधार ता. अध्यक्ष श्री बलराम पोलवाड व सर्व पदाधिकारी गोल्ला गोलेवार यादव महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post