• नांदेड जिल्ह्यातील कोळी समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित असून शासन मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत या समाजावर अन्याय करत असल्याने कोळी समाजात शासन व राज्यकर्ते यांच्या बद्दल घृणा निर्माण झाली आहे.त्यामुळे कोळी समाजाचे प्रश्न ना महाविकास आघाडीने सोडविले ना भाजप प्रणित सरकारने त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत जर कोळी समाजास कोणत्याही पक्षाने उमेदवार रिंगणात असल्यास त्यास समाज पुर्ण ताकदीने पाठिंबा असेल तसे न झाल्यास कोळी समाज स्वतंत्र उमेदवार देणार असल्याचे कोळी समाजाचे नेते मारोती बिच्चेवाड यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली.
महादेव कोळी समाजाचे नेते मारोती बिच्चेवाड यांनी दि.३ ऑक्टोबर रोजी भोकर येथील शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषदेत आयोजित केली होती.या पत्रकार परिषदेत बोलताना मारोती बिच्चेवाड यांनी गत स्वातंत्र्या पासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या कोळी समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.जातीचे प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणातील शिष्यवृत्ती,वस्तीगृह अन्य अडचणी असुन या संदर्भात शासनाकडे अनेक वेळा आंदोलन, उपोषण,धरणे आदी समाज बांधवांकडून केल्या गेले.पण अजुनही कोळी समाजाच्या मुलभूत प्रश्नाकडे शासन व राज्यकर्त्यांचे लक्ष नाही.२०१४ पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचे राज्य सत्ता असताना या पक्षाने कोळी समाजाच्या मागण्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले त्यामुळे कोळी समाजाने काँग्रेस राष्ट्रवादी, काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप-शिवसेनेच्या बाजूने मतदान करून सत्तेत बसविले. परंतु त्यांनीही काहीच काम केल्या नसल्यामुळे आज कोळी समाजाचे मुलभुत प्रश्न प्रलंबित राहुन जात आहेत.कोळी समाजावर झालेल्या अन्यायाचे समाजात शासन व राज्यकर्ते यांच्या विरुद्ध असंतोष असल्याने महादेव कोळी व मन्नेरवारलु समाजाला घेऊन स्वातंत्ररित्या निवडणूक लढविण्याची तयारी झाली आहे.अगर भोकर विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही राजकीय पक्षांनी जर कोळी समाजाचा उमेदवार दिला तर सर्व समाज त्याला निवडून आणण्यासाठी काम करेल अन्यथा स्वातंत्र्यवीत्या कोळी समाज उमेदवार देणार असल्याची घोषणा कोळी समाजाचे नेते मारुती बिच्चेवाड यांनी सांगितले.यावेळी सर्व पत्रकारांचे आभार बंडु नारमवाड यांनी मानले.