प्रतिनिधी /माली पाटील
∆ निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येणाऱ्या विधानसभा निवडणूक शासन आदेशानुसार भोकर येथील तहसीलदार सुरेश घोळवे यांची बदली कासारखेडा जिल्हा बीड येथे होऊन या ठिकाणी हादगाव येथील कार्यरत असलेले तहसीलदार विनोद गुंडमवार यांची भोकरचे तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विनोद गुंडमवार यांनी नुकताच तहसील कार्यालयाचा पदभार स्वीकारला आहे.
नूतन तहसीलदार विनोद गुंडमवार हे भोकर तालुक्यासाठी परिचित अधिकारी आहेत. ते यापूर्वी भोकर तहसील मध्ये नायब तहसीलदार निवडणूक विभाग मध्ये कार्यरत होते. त्यामुळे त्यांना भोकर ग्रामीण भागातील अडीअडचणीची जाण असल्याने ते प्रश्न सोडवण्यासाठी खास करून स्वतः लक्ष देऊन प्रयत्न करतात अनुभव असलेले आणि सर्वांशी संबंध प्रस्थापित करून उत्तम सेवा बजावणी अधिकारी असल्याने भोकर येथील तहसीलदार म्हणून परत मिळाल्याने त्यांचे तालुक्यात अभिनंदन होत आहे.
शिवसैनिकांनी केला यथोचित सत्कार
भोकरच्या तहसीलदार पदी विनोद गुंडमार यांची नियुक्ती होऊन ते पदभार स्वीकारण्याचे समजतात त्यांचे अनेक चाहते मित्र मंडळी त्यांचा सत्कार करण्यासाठी गर्दी करत आहेत. दि. ७ ऑक्टोबर रोजी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उप-संघटक सुभाष नाईक किनीकर, माजी तालुकाप्रमुख प्रदीप पाटील दौलतदार, राॅकाॅंचे तालुका उपाध्यक्ष प्रकाश बोंदीरवाड यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन येतोच सन्मान करत शुभेच्छा दिल्या आहेत