शाहू फेस्टिवल निमित्त ५ जानेवारी रोजी भोकरे येथे राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धांची मेजवानी

               शाहु फेस्टिवल,भोकर 

∆ भोकर येथील श्री शाहू महाराज मध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने दि.५ जानेवारी २०२५ रोज आयोजित "शाहू फेस्टिवल"मध्ये विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय कला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांसाठी ही आगळी वेगळी मेजवानी ठरणार आहे.

     दरवर्षी शाहू परिवाराकडून  राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धांचे आयोजन केल्या जाते यावर्षी त्यात वाढ करून अनेक सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यात सुगमवादन (ताल तंतू, सुषीर) सुगम गायन (भावगीत, लोकगीत, भक्ति) व रेकॉर्ड डांस आदींचा समावेश आहे. या स्पर्धा राज्यस्तरीय पातळीवर घेण्यात येणार असून त्यात इयत्ता ५ वि पासून पुढील कोणत्याही वर्गात शिकत असण्याऱ्या मुलामुलींना सहभागी होता येईल, स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. स्पर्धकांनी शाळा महाविद्यालयाच्या लेटरपॅड वर मुख्याध्यापक / प्राचार्याच्या प्रामुख्याच्या सही शिक्यांनीशी दि .३१ डिसेंबर २०२४ पर्यत आपल्या प्रवेशिका 8484091170,7588523520,9325158305 या क्रमाकावर पाठवून आपला प्रवेश निचित करावा. प्रवास व जेवण भत्ता अनुज्ञेय राहणार नाही. बक्षीसाचे स्वरूप,प्रथम परितोषिक ११००० /- रु ,द्वितीय परितोषिक ७०००/- रुपये, तृतीय परितोषिक ५०००/- रु. असे आहे. असे श्री शाहु महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोकर चे मुख्याद्यापक एस.एम.सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post