नांदा ते कोळगाव खु.दरम्यान असलेल्या सुधा नदीवरील पुलाची उंची वाढवुन नविन पुल बांधा -शिवसेना उबाठा

प्रतिनिधी/ माली पाटील 

∆ भोकर तालुक्यातील मौजे नांदा खु व कोळगाव खु.दरम्यान सुधा नदी असुन या नदीवर डावनल पुल बांधल्याने पावसाळ्यात नांदा खु .गावाकडे बंद होते.अशा वेळी शेतकरी, व सर्व सामान्य माणसाला याचा मोठा त्रास असुन सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे विशेष लक्ष देऊन पुढार्याच्या भुल थापाकडे लक्ष न देता या नदीवरील पुलाची उंची वाढवुन पुल बांधण्यात यावा अशी मागणी शिवसेना उबाठाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

      शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,भोकर तालुका हा जिरायती भाग असुन त्यात सुधा प्रकल्पाच्या निर्मितीने रेणापूर कोळगाव बु, कोळगाव खु,गारगोटवाडी व नांदा खु. या गावास जलसिंचनाचा फायदा होत आहे.पण या सुद्धा नदीवर पुल नसल्याने पावसाळ्यात नदी पलीकडे जाण्यासाठी पुलाची सोय नसल्यामुळे अनेक शेतकरी व तरुणांना आपलं जिव गमवावा लागला.तरी शासन निगरगट्ट.खरे तर कोळगाव खु.येथुन नांदा खु.ला जाण्यासाठी सुधा नदीवरील डाऊनल पुलावरून जावे लागते.परंतु पावसाळ्यात मात्र या नदीवर मोठा पुर येतो.व यावेळी सध्यस्थितीत असलेला डाऊनल पुल चक्क पाण्याखाली जातो.यामुळे दोन्ही गावांतील लोकांना पाणी पुलावरून उतरे पर्यंत थांबावे लागते.शालेय विद्यार्थी यांना या पुलाच्या अडचणीमुळे नाहक त्रास सहन करावे लागत आहे.या संदर्भात दोन्ही गावांतील शेतकरी व ग्रामस्थांनी आमदार, खासदार अशा लोकप्रतिनिधी यांना सांगुन ही परिस्थिती जैसे थी.आता प्रशासकीय अधिकारी यांनी तरी जनाची नाही तर नाही,मनाची ---बाळगुन हे पुल पुढचा पावसाळा सुरु होण्याअगोदर सुरू करावा अन्यथा संबंधित अधिकारी यांना शिवसेनेच्या वतीने काळे फासले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आला.या निवेदनावर शिवसेना जिल्हा संघटक सुभाष नाईक किनीकर,भुजंग पा.मांजरे, सर्कल संघटक साईनाथ गादेपवार, जेष्ठ शिवसैनिक मुन्ना पाटील, उत्तम राठोड, साहेबराव पाटील, जगदीश पप्पुलवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

   


Post a Comment

Previous Post Next Post