प्रतिनिधी /माली पाटील
∆ निवडणुकीच्या वेळी सातत्याने ईव्हीएम यंत्रणेमध्ये गडबड करून निवडणुका जिंकल्या जात असल्याच्या लोकभावना असल्याने लोकशाहीची थट्टा थांबवून लोकहितासाठी सर्व या पुढे होणाऱ्या निवडणुका ईव्हीएम यंत्रणे ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या यासाठी भोकर तालुका काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीम अकरा दिवस राबविण्यात येणार असुन या स्वाक्षरी मोहिमेस हजारो नागरिकांनी मोठा उत्स्फूर्त सहभाग घेत असल्याचे दिसून आले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सफाया करत महायुतीने 'न भूतो न भविष्यती' असा विजय संपादन केल्याने यास ईव्हीएम नियंत्रणाचा घोळ असल्याची तक्रार काँग्रेस सहित अनेक पक्षाने केली आहे. त्याचाच भाग म्हणून काँग्रेस पक्षाकडून दिनांक ५ डिसेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत ईव्हीएम हटाव जनजागृती मोहीम सुरू केली आहे या ईव्हीएम हटाव बॅलेट लाओ साठी भोकर मध्ये स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. या स्वाक्षरी मोहिमेला पहिल्याच दिवशी हजारो लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे समजते. भोकर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नियोजित पुतळ्याजवळ स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आले असून माजी मंत्री डॉक्टर माधवराव किन्हाळकर, माजी सभापती बाळासाहेब रावणगावकर, भोकर काँग्रेस तालुका अध्यक्ष गोविंद गौड पाटील, शहराध्यक्ष तहसीब इनामदार, जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ वर्षेवार, शिवाजी पाटील लघळुदकर या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यापासून सुरुवात करण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहीम ही अकरा दिवस चालणार असून भोकर तालुक्यातील तमाम मतदार बंधू आणि सुजाण नागरिकांनी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या मोहिमेत सहभाग नोंदवून स्वाक्षरी करावे असे, आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निळकंठ वर्षेवार, धोंडीबा भिसे, बाबा खान, गोविंद देशमुख, सम्राट हिरे, सुनील कांबळे, नईम तळेगावकर, सचिन पांचाळ, लक्ष्मण डोंगरे, शेपी इनामदार, महिला आघाडीच्या सुरेखा माळी, सुरेखा गजभारे, बेग अफरोज खान, आमिर खान पठाण आदी कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.