प्रतिनिधी/माली पाटील
∆ भोकर तालुक्यातील किनी-पाळज रस्त्यावरील पाकी फाट्याजवळ मोटरसायकल निष्काळजीपणे भरवेगात चालवताना मोटरसायकल रस्त्याचे काम चालू असलेल्या लगतच्या खड्ड्यात पडून एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना रविवार दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता घडली असून मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा पोलीसात दाखल करण्यात आला आहे.
या बाबत असे की,सोमठाणा-किनी-पाळज या राज्य रस्त्याचे काम सुरू आहे.यामुळे रस्ता खोदला असुन काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूने चार ते पाच फुट नाली खोदले याच रस्त्यावरुन मौजे मालदरी येथील रहिवासी विष्णू राम जाधव व कैलास बाबा जाधव हे सकाळी सहा वाजता मालदरी तांडा येथून मोटरसायकल क्र.एम.एच. २६ बी एस ७१९६ या मोटरसायकलने भोकरकडे जात होते. विष्णू जाधव हा भरवेगात व निष्काळजीपणे मोटरसायकल चालवत असताना रविवार सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान पाकी फाट्याजवळील पोल्ट्री फार्म जवळील रस्ता लगतच्या खोदलेल्या खोल खड्ड्यात पडल्याने पाठीमागे बसलेला कैलास बाबा जाधव यास जोराचा मार लागून त्याच्या नाका तोंडातून रक्त निघाल्याने तो जागीच ठार झाला.तर मोटर सायकल चालक विष्णू जाधव यास गंभीर दुखापत झाली.त्यास रुग्णालयात हलविण्यात आले.मयत कैलास चा मुलगा अर्जुन कैलास जाधव याने पोलिसात मोटरसायकल चालक यांच्या विरोधात तक्रार नोंदविल्याने गुरनं १४ भारतीय न्यास संहिता २८१, १२५ (अ), १२५( ब) १०६ अन्वये मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली किडनी ओपीचे जमादार बालाजी लक्षटवार हे करीत आहेत.