मौजे मालदरी येथील अपघात मयताच्या कुटुंबास कु.दामिनी दादाराव ढगे यांच्या कडुन २५ हजारांची मदत


                   प्रतिनिधी/ माली पाटील 

∆ भोकर तालुक्यातील मौजे मालदरी येथील युवक काम चालू असलेल्या रस्त्यालगतच्या खड्ड्यात मोटरसायकल पडुन मरण पावला होता.त्यास आर्थिक सहाय्य म्हणून कु.दामिनी दादाराव ढगे यांच्या कडुन २५ हजार रुपयांची मदत केली आहे.यामुळे थोडा फार काही का होईना आर्थिक आधार त्या कुटुंबाला मिळाला आहे.

     निवडणूक आली कि सोंग करणारे बरेच पाहीले पण निवडणूक संपली तरी मानवता धर्म म्हणून मदतीचा ओघ वा आर्थिक मदत सुरु ठेवुन मी नाही त्यातला म्हणून गरीबांसाठी देवदुत ठरणारे दादाराव ढगे यांच कौतुक करावं तेवढं कमीच! दि.१२ जानेवारी २५ रोजी पाकी फाट्याजवळ मोटरसायकल पडुन कै.कैलास बाबा जाधव हा जागीच मरण पावला आहे. कै.कैलास जाधव हा भुमीहीन असुन तो मरण पावल्याचे समजताच दानशुर दादाराव ढगे यांनी दि.१६ जानेवारी रोजी मालदरी तांडा येथे त्यांचे बंधू गोविंद पा.ढगे यांना पाठवुन त्या दु:खी कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून २५ हजार रुपये रोख रक्कम काँग्रेस तालुका महिला अध्यक्ष विजयालक्ष्मी व्यंकटरेड्डी करेमगार यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी गोविंद पा.ढगे, शिवसेना जिल्हा उ. संघटक सुभाष नाईक किनीकर, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष प्रकाश बोंदीरवाड, पत्रकार उत्तम कसबे,जयंत जाधव, बालाजी जाधव, अरविंद कदम, वसंत राठोड,देविदास राठोड,रामधन राठोड आदी उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post