भोकर डॉक्टर असोसिएशनच्या वतीने पत्रकार व कुटुंबीयांची मोफत आरोग्य तपासणी

               ‌प्रतीनिधी / माली पाटील 

 भोकर तालुक्याच्या विकासासाठी व सामाजिक हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन डॉक्टर असोशियन भोकर च्या वतीने करण्यात आले.

             दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर दर्पण दिनाचे औचित्य साधून १९ जानेवारी २०२५ रोजी केशव हॉस्पिटल भोकर येथे पत्रकारांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. नांदेड येथील डॉ. राहुल कोटलवार( एम.डी. मेडिसिन ) यांनी सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या इसीजी, रक्त शर्करा,बिपी , लठ्ठपणा  अशा विविध रोगाबाबत तपासण्या करण्यात आल्या.ज्येष्ठ पत्रकार एल.ए.हिरे,बी. आर. पांचाळ, उत्तम बाबळे, राजेश वाघमारे, मनोज गिमेकर, सुभाष नाईक किनीकर यांच्या उपस्थितीत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या  प्रतिमेचे पूजन करून  शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सर्व पत्रकारांचा डाॅक्टर असोसिएशन भोकरच्या वतिने पुष्पहाराने सन्मान करण्यात आला. यावेळी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राम नाईक, डॉ. बी.आर. पारवेकर, डॉ. साईनाथ वाघमारे, डॉ. बालाजी बिलरवार, डॉ. धनंजय पारडीकर, डॉ. राहुल वानोळे, डॉ. प्रज्वलित सोनकांबळे, डॉ. पुरुषोत्तम कल्याणकर, डॉ. बोंदिरवाड आदींनी शिबिरासाठी परिश्रम घेतले. सर्व पत्रकारांची तपासणी करण्यात आली.


Post a Comment

Previous Post Next Post