प्रतिनिधी / माली पाटील
• राज्य शासनाने राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामांतर घडवुन आणत या संस्थेला महान वक्तीचे नावे दिली यात भोकरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस मराठवाडा मुक्ती संग्रामात आपले योगदान दिलेल्या स्वतंत्र सेनानी डॉ. दासराव साखळकर यांचे नाव देऊन त्यांचा गौरव करण्यात आल्याने दिलेले नामकरण सदैव प्रेरणादायी ठरेल असे मत खासदार अशोक चव्हाण यांनी बोलताना व्यक्त केले.
भोकर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भोकरचे स्वातंत्र्य सेनानी डॉ.दासराव साखरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा नामांतर सोहळा कार्यक्रम दि.२७ जानेवारी रोजी आयटीआय मध्ये आयोजित करण्यात आले होते.यावेळी उद्घाटक म्हणून खा.अशोक चव्हाण हे होते.तर
प्रमुख पाहुणे म्हणून आ. श्रिजयाताई चव्हाण, बालाजी कंटेवाड, सुदाम पाटील, गोविंद पाटील चिंचवडकर, देशमुख यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की महाराष्ट्र शासनाने भोकरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस मराठवाडा मुक्ती संग्रामातील लढाऊ व्यक्ती निजामासी दोन हात करत शिक्षा भोगलेले स्वातंत्र्य सेनानी चे नाव देऊन त्यांचा गौरव केला आहे. मी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करतो आणि मराठवाडा मुक्ती संग्रामात त्यांनी दिलेले योगदान कधीच मराठवाडा विसरू शकणार नाही त्यांचे या संस्थेला दिलेले नामकरण सदैव प्रेरणादायी राहील.
तसेच या औद्योगिक संस्था प्रशिक्षण संस्थेस भव्य अशी इमारत मिळाल्यामुळे तालुक्यातील अनेक विद्यार्थी उद्योगाने प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी होतील असा आत्मविश्वास व्यक्त केला. आमदार श्रीजयाताई चव्हाण यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की,स्वातंत्र्य सेनानी दासराव साखरकर यांच्या प्रेरणादायी जीवनाला वंदन केला. यानंतर भाजपाचे बाळा साखळकर यांनी साभार व्यक्त करत मत मांडले.या कार्यक्रमाचे प्रस्तावित प्राचार्य विश्वंभर कंदलवाड यांनी केले. तर आभार साखळकर परिवाराने मानले. सूत्रसंचालन प्रा. मीरा जोशी यांनी केले. यावेळी शहरातील प्रतिष्ठित व साखळकर परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.