राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इंजी-विश्वभंर पवार यांच्या वतीने भोकरे तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान

 


                    प्रतिनिधी/ माली पाटील 

∆ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इंजिनीयर विश्वंभर पवार यांच्या कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर दर्पण दिनाचे अवचित्य साधत ओळख तालुक्यातील सर्व पत्रकारांचा डायरी व पेन देऊन शाल श्रीपाळ देत सन्मान करण्यात आला आहे. 

     देशाचा चौथा स्तंभ असलेला व सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देत लेखणी चालवणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात राजकीय पुढारी आमदार खासदार कुठेच दिसत नाहीत परंतु याची जाण ठेवत राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा डीपी टीसी चे सदस्य इंजिनीयर विश्वंभर पवार यांनी या सर्वांना फाटा मारत भोकर तालुक्यातील सर्व पत्रकारांचा दर्पण दिनाचे अवचित साधून दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता सत्कार समारंभ राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय नांदेड रोड येथे ठेवण्यात आला या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार बिहार पांचाळ हे होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व पत्रकारांचा डायरी व पेन देत  पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी चे माधव पा. व्यवहारे, विजय पा. सोळंके, कृष्णा ठाकूर हे उपस्थित होते. इंजि. विश्वंभर पवार पांचाळ यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रस्तावन युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सचीव आनंद शिंदे कर यांनी केले तर सूत्रसंचालन युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दर्शन पा.डुरे  यांनी केले तर आभार चेतन पा. सोनारीकर यांनी केले.


Post a Comment

Previous Post Next Post