प्रतिनिधी / माली पाटील
∆ अखेर दोन महिन्यांपासून रेंगाळत पडलेल्या पालकमंत्री निवडीचा गुंता जवळपास सुटला असुन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हे भाजपच्या झुंझार नेत्या तथा पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंढे यांची निवड झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
महाराष्ट्र राज्यात महायुतीची बंपर सत्ता येऊन जवळपास तिन महिने होत आहेत.पण युतीच्या पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटेना झाला.कारण अनेक ठिकाणच्या जागेवर शिंदे शिवसेना आग्रही आहे.पण भाजप त्यास राजी नसल्याने हा वाद खिजपत पडुन राहत आहे.यामुळे जिल्ह्यातील विकास कामांना खिळ बसत असुन या सर्व बाबींचा कारभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहत आहेत असं बोललं जात आहे.त्यामुळे काही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा सोडण्यात येऊन नांदेड जिल्ह्यासाठी स्पर्धेत असलेले मंत्री आशिष शेलार,मंत्री प्रमोद महाजन व मंत्री पंकजाताई मुंढे यांची नावे अग्रक्रमाने होते.पण यात मराठवाड्याच नेतृत्व म्हणून पंकजाताई मुंढे यांची नांदेड जिल्हा पालकमंत्री म्हणून निवड झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.नांदेड जिल्ह्यातील किनवट,मुखेड व नायगाव मतदारसंघाचे आमदार हे मुंढे समर्थक असुन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा ही मुंडेना विरोध नसल्याचे समजते.त्यामुळे नांदेडच्या नुतन पालकमंत्री म्हणून त्यांची निवड निश्चित झाल्याचे समजते.