तामसा प्रतिनिधी /नंदेश्वर भुतनर
∆ हदगाव तालुक्यातील आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळझरा शिवारातील एका झुडपातुन रडण्याचा आवाज सकाळी शेताकडे जात असलेल्या वाटसरू शेतकऱ्यांना आल्याने तो जवळ जाऊन बघितले असता जमिनीच्या मोकळ्या जागेत चार तासापूर्वी जन्मलेले अर्भक दिसले.हि घटना दि १ मार्च रोजी घडली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत असे की, हादगाव तालुक्यातील मौजे माळझरा आदिवासी भागातील शेतकरी हे शनिवारी सकाळी शेतीकडे जात असताना शेतकऱ्यांना लगतच्या झुडपातून रडण्याचा आवाज येत असल्याने तो शेतकरी त्या आवाजाच्या दिशेने जवळ जाऊन बघितले असता जमिनीवर मोकळ्या जागेत चार तासापूर्वी जन्मलेले अर्भक दिसले.तेव्हाते हडबडीने त्यांनी याबाबत माळझरा येथील पोलीस पाटील वसंतराव हाके यांना माहिती दिली असता पोलीस पाटील यांनी लगेच मनाठा पोलीस प्रशासनाला माहिती दिली. सदरील घटनेची माहिती कळताच माळझारासह परिसरातील नागरिक व महिलांनी गर्दी केली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील प्रक्रियेसाठी बरडशेवाळा प्रा. आरोग्य केंद्रात अर्भक दाखल केले. सदरील मुलगी चार तासापूर्वी जन्मलेले असून पावणे दोन किलो वजनाची असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर के. सी. बर्गे यांनी सांगितले. मुलीचे अर्भक झुडपात जमीन माखलेली असल्याने तिला आरोग्य सेविका टेकाळे व चिंचगव्हाण येथील आशा सेविका यांनी प्राथमिक योग्य ती देखभाल केली. त्यानंतर मनाठा पोलीस प्रशासनाने नांदेड येथील शासकीय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे त्या अर्भकाला दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली मनाठा पोलीस प्रशासन करीत आहे.