भोकर येथे दोन मोटारसायकली समोरासमोर धडक एक ठार तर एक जखमी

                   लोकभावना न्युज वृत्तसेवा 

∆ भोकर तालुक्यातील भोकर-उमरी रस्ता हा अपघाच जणु माहेर घरच बनत चाललेल दिसत आहे.याच रस्त्यावर गुरुवार रोजी मंजीत कॉटन मिल जवळ दोन मोटारसायकली समोरासमोर येऊन धडकल्याने यात एक जण जागीच मृत्यू पावला तर दुसरा गंभीर झाल्याची घटना दि. २७ मार्च रोजी घडली आहे.

       या बाबत असे की, दि.२७ मार्च रोजी गुरुवार हा भोकरचा आठवडी बाजार.येथील बाजार आटोपुन भोकरहुन मौजे डौर येथील शिवाजी विठ्ठलराव बोईनवाड वय ४२ हे ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या गावाकडे निघाले.ते आपली मोटारसायकल क्र. एम एच २६ पि ६८४८ ने भोकर- उमरी येथील मंजीत फॅक्टरी येथे येताच उमरीकडुन येणाऱ्या भरधाव वेगात येणार्या मोटार सायकल क्र.एम एच २६ बी झेड ८६१४ ने समोरासमोर जोराची धडक दिली.या जोराच्या धडकेत डौर येथील शिवाजी विठ्ठलराव बोईनवाड वय ४२ वर्ष हे जागीच ठार झाले. एवढाअपघात भिषण होता..तर दुसरे सुर्यकांत दतराव मुंडकर रा.कार्ला ता.उमरी हे गंभीर जखमी झाले.त्यांना भोकर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नांदेड येथे हलवले. या घटनेची माहिती मिळताच भोकरचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले व पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सोनाजी कांगले व पोलीस जोंधळे प्रमोद हे अधिक तपास करत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post