भोकरे येथे रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

                    लोकभावना न्युज वृत्तसेवा 

 भोकर - श्री रामनवमी निमित्त भोकर शहरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून महाप्रसाद, भंडारा, अभिषेक, पूजा, रामकथा असे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.

      भोकर येथील तेलीगली राम मंदिरात चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून दररोज श्री राम कथा आयोजित करण्यात आली आहे रात्रीच्या वेळी किर्तन भजनाचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत पवार कॉलनी येथील साईबाबा मंदिरात राम नवमी निमित्त 5 एप्रिल रोजी सायंकाळी 9 वाजता ह. भ. प. श्यामसुंदर गिरी महाराज आष्टीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे 6 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन दत्तात्रय पांचाळ यांनी केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post