लोकभावना न्युज वृत्तसेवा
• सुधारीत पिक विमा योजनेत पिक पेरणी पासुन ते पिक काढणीपर्यंत नुकसान झाल्यास केवळ पिक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार आहे.तसेच एक रुपया पिक विमा योजना बंद करण्यात आली आहे.शेतकर्याना आता केंद्राने ठरवुन दिल्याप्रमाणे विमा हप्ता भरावा लागणार आहे.सरकारला शेतकऱ्यांच्या हिता ऐवजी कंपन्यांचे कंपनी च्याच हिताची काळजी या सुधारित पिक विमा योजने वरुन लक्षात येते.
पीक विमा योजनेत बदल करण्याचा निर्णय नुकताच राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला होता. पीक विमा योजनेत कोणते बदल असतील ? याविषयीचा शासन आदेश राज्य सरकारने दि.९ मे रोज शुक्रवारी काढला.
सुधारित पीक विमा योजना खरिप २०२५ आणि रब्बी २०२५-२६ हंगामात राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच पीक योजना राबविली जाणार आहे. राज्याने घेतलेले ४ अॅड ऑन कव्हर्स म्हणजेच विमा जोखमीच्या बाबी काढून टाकण्यात आल्या आहेत. पिकाचे नुकसान काढताना भात, गहू आणि कापूस या पिकांचे ५० टक्के उत्पादन तंत्रज्ञान आधारित गृहीत धरले जाईल, तर ५० टक्के उत्पादन पीक कापणी प्रयोगातून गृहीत धरले जाणार आहे. इतर पिकांचे नुकसान पीक कापणी प्रयोगातूनच काढले जाईल. सुधारित पीक विमा योजना राबविण्यात येणार असल्याने राज्य सरकारने कंपन्यांसोबतचे आधीचे करार रद्द केले. तसेच सुधारित योजना राबविण्यासाठी विमा कंपन्यांसोबतच करार केले जाणार आहेत.