विद्यार्थी घडवत साहित्य व सामाजिक क्षेत्रात अतुल्य कार्य करणारे बालाजी तुमवाड प्रसंसनीय शिक्षक - उप-सचिव एच.व्ही. आरगुंडे

            प्रतिनिधी /माली पाटील 

                    लोकभावना न्युज वृत्तसेवा 

शिक्षण शिकवत असताना विद्यार्थी कसा घडविता येईल यांचे धडे देत असताना व यातुन मिळालेल्या वेळेत साहित्य व सामाजिक क्षेत्रात अतुल्य कार्य करुन सेवेला समर्पित करणारे शिक्षक बालाजी तुमवाड प्रसंसनीय शिक्षक असल्याचे प्रतिपादन मंत्रालयीन उप-सचीव एच. व्ही. आरगुंडे यांनी केले आहे. ते तुमवाड यांच्या सेवापुर्ती व ' एका वादळाच्या प्रतीक्षेत'या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते.

भोकर येथील अदित्य बॅक्वेट हाॅल मध्ये दि. १ जुन रोजी शिक्षक बालाजी तुमवाड यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा आणि त्यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी सेवा समर्पन परिवार व तुमवाड परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिगंबर बिंदू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंजाब चव्हाण हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी परभणी डाॅ.सौ.सविता बिरगे,इसापचे दत्ता डांगे, गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे, हदगाव गट शिक्षणाधिकारी के.व्ही. फोले, साहित्यिक बाबाराव विश्वकर्मा, शिक्षक परीषेदेचे अध्यक्ष मधुकर उन्हाळे, निळकंठ पाचंगे, डॉ.विक्रम मानुरे, डॉ.राम वाघमारे,से.स.अध्यक्ष दिगंबर देशमुख, बालाजी तुमवाड, सौ.यमुना तुमवाड हे होते.बालाजी पूर्ण वाढ सरांनी समाजसेवा व पर्यावरण संवर्धन साहित्य कला जोपासत या क्षेत्रात नोकरी प्रामाणिकपणे करून आपले पणाचे अस्तित्व सिद्ध केले. नोकरी करीत सामाजिक कार्य करणे हे धारिष्ट फार कमी लोकांमध्ये असते, पण तुमवाड सरांनी यातून आपले जीवन चांगले आनंददायी बनविले असे अध्यक्षीय समारोप करताना डॉक्टर पंजाब चव्हाण यांनी विचार व्यक्त केले.यावेवेळी " एका वादळाच्या प्रतीक्षेत'या कविता संग्रहाच्या प्रकाशनाचे विमोचन करण्यात आले.यानंतर सेवा समर्थन परिवाराकडून मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.बालाजी तुमवाड यांच्या सेवा पुर्तीच्या औचित्याने त्यांचे विद्यार्थी व अनेक चाहत्यांकडून सत्कार करण्यात आला.या सत्काराच्या वेळी भारावून तुमवाड सर यांचे आनंदाचे अश्रू अनावर झाले होते.प्रास्तावीक डॉ.स्मिता मानुरे यांनी केले तर सुत्रसंचलन सुरेश दंडवते तर आभार डॉ.शुभम तुमवाड यांनी मानले.या संपुर्ण कार्यक्रमाचे सुनियोजन पत्रकार विठ्ठल फुलारे यांनी केल्याचे दिसून आले.


Post a Comment

Previous Post Next Post