१ जुलै रोजी भोकर तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत

                    :  माली पाटील :

                        लोकभावना न्युज 

• महाराष्ट्र सरकारच्या धरसोड वृत्तीने व ओबीसी कोठा वाढल्याने व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकिच्या पाठोपाठ होणाऱ्या ग्रा.पं. सरपंच पदाचे आरक्षण यापूर्वीच्या सरपंच पद २०२५ चे आरक्षण रद्द करण्यात येऊन आता नव्याने सरपंच पदाचे आरक्षण दि.१ जुलै रोजी भोकर तहसिल कार्यालयात निश्चित करण्यात येणार आहे

    भोकर तालुक्यात एकुन ६६ ग्राम पंचायती असुन त्यात शासनाने प्रवर्ग निहाय आरक्षित केलेल्या सरपंच पदाची  केलेले जात निहाय संख्या- अनुसूचित- जाती १० त्यात महिला ५ सरपंच, अनुसूचित जमाती- १४ महिला ७,नामाप्र-१८ महिलांसाठी ९ राखीव तर खुला प्रवर्ग (ओपन)- २४ यात महिलांसाठी १२ जागा राखीव ठेवण्यात आले आहे. महिलासाठी ५० टक्के ग्राम पंचायती निवड करणे,जेथे सोडत ड्रा लाॅटस काढावे लागतील तेथे असी कारवाई ग्रा.पं.तीच्या निवडुन आलेल्या सदस्य व उपस्थित नागरीकासमोर करावी अशा सूचना ही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तहसीलदाराना दिले आहे.भोकर  तालुक्यातील जनतेनी या सरपंच सोडत कार्यक्रमास भोकर तहसील येथे ११ वाजता हजर रहावे असे आवाहन तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post