आ. अँड.श्रीजया चव्हाण यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी
प्रतिनिधी / माली पाटील
∆ किनी येथील शेतकऱ्यांचे मुख्य पिक म्हणून साळ (धान)हे पिक मोठ्या प्रमाणावर घेत असे पण गत गत सात ते आठ वर्षांपासून अवेळी पडणार्या पावसामुळे यातच पाझर तलावातील पाण्याच्या कमी साठवण यामुळे साळ पिकास पाणी मिळत नसल्याने हे पिक घेणे बंद झाले.यानंतर गत दोन वर्षांपासून किनी व परिसरात मका या पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात येत आहे.पंरतु बदलत्या पिक विमा योजनेत मका हे पिक घेऊन ही विमा मात्र भरुण घेण्यास सिएसपी सेंटर वाले नकार देत असल्याने या भागातील मका उत्पादक शेतकरी या पिक विम्यापासुन वंचित राहणार असल्यानची शक्यता असल्याने मक्याचा पिक विमा उतरविण्या साठी आमदार अँड. कु.श्रीजया चव्हाण यांनी विधानसभेत प्रश्न मांडुन शासनाकडून मका या पिकांचे विमा भरुन घेण्याविषयी प्रयत्न करुन किनी भागातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजप नेते तथा अ.भा.भोई समाज संघाचे जिल्हाध्यक्ष गणपतराव पांडलवाड यांनी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
किनी व परिसरात सध्या कापूस व सोयाबीन पिकाचे क्षेत्र कमी झाले असुन या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर मका या पिकाची लागवड केली आहे.पण या मका लागवडी मुळे रान डुकरांचा मोठा त्रास सहन करावा लागत असला तरी कापुस व सोयाबीन पिकांपेक्षा मका पिक चांगले असल्याने मका पिकाची लागवण केली गेली.पण सध्या शासन पिक विमा मध्ये यंदा मोठे फेरबदल करण्यात आले.या फेरबदल मध्ये मका पिक विमा मध्ये घेण्यात आला.परतु जेव्हा मका या पिकांचे विमा भरायला गेल्यावर सिएसपी सेंटर वाले यांनी मका पिकाचे विमाचे विमा नसल्याने भरणार नसल्याचे सांगितले.पंरतु किनी व परिसरात मका पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली असल्याने भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अँड.श्रीजया चव्हाण यांनी या संबधी अधिवेशनात ताराकिंत प्रश्न मांडुन मका पिकाचा विमा लागु करुन मका धारक शेतकऱ्यांना विमा भरुण घेण्याचा दिलासा द्यावा अशी मागणी भाजपचे नेते तथा अ.भा.भोई समाज जिल्हा अध्यक्ष गणपत पांडलवाड यांनी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.