भाजपाचे ओबीसी जिल्हा अध्यक्ष राजेश करपे लवकरच काँग्रेस वाशी होणार

 भोकर (बातमीदार) भोकर तालुक्यातील भाजपचे निष्ठावंत व धडाडीचे नेते तथा भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजन करपे हे लवकरच नविन वर्षाच्या मुहूर्तावर आपल्या समर्थकांसह काँग्रेसवासी होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी की, भोकर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जे पक्षासाठी व पक्षवाढीसाठी मेहनत घेतलेले भाजपाचे ओबीसी जिल्हा अध्यक्ष तथा वंजारी समाज संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष माजी सरपंच राजेश करपे हे भारतीय जनता पक्षाला सोड चिठ्ठी देऊन आपल्या असंख्य समर्थका सह काँग्रेस पक्षात प्रवेश करणार ? असल्याचे सांगण्यात आले.ते धानोरा येथील असुन येथील ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे.त्यांच्या भाजपा सोडण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही पण त्यांना या संबंधी विचारणा केली असता ते काँग्रेस पक्ष प्रवेशास दुजोरा(फोनवरून)  दिला आहे.यामुळे भारतीय जनता पक्षात भगदाड पडणार एवढे मात्र निश्चित !


Post a Comment

Previous Post Next Post