भोकर (बातमीदार) - पान टपरी जागेवर लागल्याच्या वादामुळे हुलगुंडे व इतर लोकांवर प्राणघातक हल्ला केला प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल नसल्याने त्या पंधरा आरीपीवर ३०७ व जबरी मारहाण चा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी शेतकरी संघटनेचे नेते किसनराव पाटील हुलगुंडे हे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन भोकर येथील उप विभागीय कार्यालया समोर दि.२० डिसेंबर पासून अमर उपोषणास बसले असुन आज त्यांचा पाचवा दिवस असुन यात एकाची परिस्थिती गंभीर झाल्याने त्यास पोलीस प्रशासनाने दवाखान्यात हलविण्यात आले आहे.
या बाबत असे की,भोकर शहरातील शास्त्रीनगर येथे दि.७ नोव्हेंबर २०२१ रोजी शेतकरी संघटनेचे नेते किशनराव पा हुलगुंडे यांना व इतरांना धारदार शस्त्र काठी व लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर करून जख्मी करण्यात आले या प्राणघातक हल्यात किशन हुलगुंडे यांचे हात फ्रक्चर झाले.हनुमंत हुलगुंडे यांचे डोके फोडण्यात आले.तर मिनाबाई हुलगुंडे यांनाही मारहाण करण्यात आले.दतराम कुंडकर यांना गजाळीने मारहाण केली अशा या प्रकरणात पंधरा आरोपी असताना सुद्धा सात लोकावरच केवळ साधा गुन्हा दाखल करण्यात आला.पुरवणी जवाब नोंदविला नाही.त्यामुळे आरोपी मोकाट असुन परत घ्या समोर येऊन धमक्या देत आहेत.म्हणुन आरोपी विरुद्ध कलम ३०७,३२६ प्रमाणे आरोपी राजेश जटलवाड, बालाजी चार्लेवाड, सुभाष तुंबलवाड,चेतन पाटील, व्यंकटेश बोटेवार,प्रविण ईबीतवार,वैभव,शिवा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे नेते किशनराव विठोबा पा. हुलगुंडे यांनी दि.२० डिसेंबर पासून अमर उपोषणास बसले असुन आजचा पाचवा दिवस असुन यात एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास पोलिस प्रशासनाने दवाखान्यात हलविण्यात आले.प्रशासन जो पर्यंत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत उपोषण माघार घेणार नसल्याचे उपोषण कर्ते तथा शेतकरी संघटनेचे नेते किशनराव पा हुलगुंडे यांनी लोकभावना न्युज ही बोलताना सांगितले.