भोकर तालुक्यांत गेल्या महिनाभरापासून दुय्यम निबंधक कार्यालयात बि एस एन एल ची इंटर नेट
सेवा बंद असल्याने भोकर व तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठे हाल होत असुन यामुळे अनेकांच्या शेती खरेदी-विक्री व प्लॉटिंग रजिस्टर थांबले असल्याने जनतेत नैराश्य पसरले असून याकडे पालकमंत्री अशोक चव्हाण हे लक्ष देतील काय असा सूर भोकरच्या जनतेत बोलताना दिसून येत आहे
भोकर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी भोकर येथे दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालय आहे या कार्यालयांतर्गत दस्ताची नोंद करणे दत्ताच्या सूचीची प्रमाणित नक्कल देणे व करणे तसेच शेतकऱ्यांच्या शेतीची खरेदी-विक्री करणे धारकांची रजिस्ट्री दस्त नोंदणी सह अनेक काम या कार्यालयांतर्गत केली जाते पण भोकर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्या महिन्याभरापासून इंटरनेट सेवा बंद असल्याने कामकाज बंद पडले आहे सध्या नेटवरच कामे होत असल्याने इंटरनेट सेवा जर बंद राहिली की कामकाज होत नाही भोकर शहरात विकासाचे कामे चालू असल्याने रस्ते जेसीबी खोदकाम करीत आहेत या खोदकामात बीएसएनएलचे जमिनीतील वायर अनेक ठिकाणी तुटुन पडले आहे तर काही ठिकाणी वायर चोरट्याने चोरून नेले आहे त्यामुळे या केबलवर असलेले पूर्ण इंटरनेट व्यवहार ठप्प झाले आहे याचा फटका दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजावर बोलत आहे पडला आहे तब्बल महिना होत असून सध्या इंटरनेट सेवा सुरू नसल्याने याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने जनतेत निराशेचे वातावरण पसरले आहे त्यामुळे आता याकडे राज्याचे बांधकाम मंत्री राज्य कथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी याकडे लक्ष देऊन संबंधित बंद पडलेले कामकाज सुरू करून लोकांना दिलासा द्यावा अशी सर्वसामान्य जनतेची मागणी होत आहे.