भोकर (बातमीदार) भोकर तालुक्यातील मौजे कांडली येथील सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक लागली असून या निवडणुकीत शिवसैनिकांनी प्रस्थापितांच्या विरोधात पॅनल रिंगणात उतरले असून यात शिवसेना पुर्ण जागा निवडून आणण्यासाठी शिवसैनिक कामाला लागले असुन शिवसेना कांडली सेवा सहकारी संस्थेवर भगवा झेंडा फडकणार असल्याचे सेनेचे प्रमुख लक्ष्मण ईरलोड यांनी सांगितले.
भोकर तालुक्यात सध्या सहकार क्षेत्राच्या निवडणुका लागल्या आहेत.यातच मौजे कांडली येथील सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक लागली आहे.यात अनु-जाती,जमाती,इतर मागासवर्गीय, भटक्या जाती जमाती, महिला प्रतिनिधी व सर्व साधारण जागा अशा एकूण १३ जागा असून दिनांक १० जानेवारी २०२२ रोजी मतदान व मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत शिव सेनेचे उमेदवार म्हणून ईरलोड लक्ष्मण,पडालोड गंगाबाई रेड्डी,डुम्मलवाड सरस्वतीबाई, सोनटक्के सखाराम, बंडगर राजेश्वर, रावलोड कृष्णा,शिंदे शिवाजी,कोलपवाड गंगाधर सुरकर देवीदास,रावलोड दिगंबर,जाधव विठ्ठल,खोदानपुरे बाबुराव हे निवडणूक लढवीत आहेत.सध्या कांडली गावात मतदाराचा कौल शिवसेनेकडे असुन शिवसेना सर्वच जागा जिंकेल असा विश्वास शिवसेनेचे ईरलोड लक्ष्मण यांनी लोकभावना न्युजसी बोलताना केला.सदर पॅनल निवडून आणण्यासाठी शाखा प्रमुख रावलोड लक्ष्मण जेष्ठ शिवसैनिक देवराव कोंडामोड, बबनराव मुंडकर, नारायण मुंडकर, अरविंद लिंगालोड, शंकर कोळपेकर, साईनाथ बडुरे, रमेश वडणापोर,नरसारेड्डी डुम्मलवाड हे प्रयत्न करत आहेत.