भोकर (बातमीदार) दि.२७ - भोकर शहरातील मुख्य चौक जे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखले जाते त्या मुख्य चौकात गेल्या अनेक दिवसांपासून नाल्यांचे गलिच्छ पाणी रस्त्यावर वाहत आहे.त्याच पाण्यातुन वाहणे,शाळकरी मुले असे सर्वच लोकांना जावे लागत आहे.एकीकडे न.प.प्रशासन स्वच्छतेचा डांगोरा पिटते अन् इकडे मात्र जैसे ती परिस्थिती. न.प.ला मनाची नाही पण जणांची तरी वाटु
द्यावे असे जनता खुलेआम बोलत आहे त्यामुळे न.पा.प्रशासनाने मुख्य चौकातील नाल्यातून येणारे गलिच्छ पाणी थांबवावे असी भोकर वाशीयाची मागणी आहे.
भोकर शहराचा विकास मोठ्या वेगाने वाढत असुन पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण हे शहराच्या विकासासाठी निधी प्राप्त करुन घेत आहेत.पण त्या निधीचा विनियोग योग्य होत नसुन यातील बरेच कामे शहरात थातुरमातुर केल्याचे दिसून येते.एकिकडे स्वच्छ शहर ,सुंदर शहर म्हणुन गवगवा करायचा आणि ईकड शहर मात्र दुर्गंधी व अस्वच्छ.त्यामुळे नाली दुरुस्त करून रस्त्यावर येणारे पाणी थांबवावे अशी भोकर वाशीयाची मागणी आहे.