भोकर ( बातमीदार) दि.३१ - सावधान पुन्हा कोरोना डोके वर काढत असल्याने व राज्यात गत २४ तासांपासून कोरोना बाधीतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्य सरकारने महाराष्ट्रात नवे नियम लागू केले असून जनतेने यांचे काटेकोर पुणे नियम पाळावे व मास्क सानीटायजरचा नित्यनेमाने वापर करावा असे सरकारने आव्हान केले आहे.
राज्यात सध्या कोरोना व त्या सोबत ओमोक्रोन बाधीताचे रुग्ण संख्या वाढत असुन कोरोणा ५३६८ वर पोहचली आहे.तर ओमोक्रोनची रुग्णांच्या १९८ वर पोहचली आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने गुरवारी रात्री परिपत्रक जारी करत राज्यात कडक निर्बंध लागू केलेले आहेत.त्या नुसार लग्न आमी इतर कार्यक्रमांसाठी ५० लोकांची मर्यादा तर अंत्यविधीला २० लोकांनाच परवानगी राहील यापुढे लग्न सोहळा अथवा सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असेल तर ५० लोकांपेक्षा अधिक नागरीकांच्या प्रवेशावर बंदी असेल तसेच अंत्य संस्काराला गर्दी टाळण्यासाठी फक्त २० लोकांना यापुढे परवानगी असणार आहे.त्याच बरोबर सार्वजनिक ठिकाणी गर्दी रोखण्यासाठी कलम १४४ लागु करण्यात आले आहे.या नव्या नियमानुसार राज्यात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री पासुन कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहे.