भोकर ( माली पाटील यांचे कडुन) दि. १ - मुंबईत ओमायक्रानच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे त्यानुसार मुंबईत आंदोलन करत असलेल्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हटवण्यात आले आहे करुणा रुग्णाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकतीच नवी नियमावली जारी केली होती त्यानुसार मुंबईत सार्वजनिक ठिकाणी संध्याकाळी पाच ते पहाटे पाच पर्यंत जमाबंदी करण्यात आली आहे शुक्रवारी मध्यरात्रीपासून हा नियम लागू झाला आहे त्यामुळे पोलिसांनी शनिवारी पाच वाजल्यानंतर आझाद मैदानातील आंदोलकांना बाहेर जाण्यास सांगितले यावेळी एसटी आंदोलकांनी सहकार्याची भूमिका घेत मैदानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला परंतु हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे संपकरी कर्मचारी मी स्पष्ट केले आहे मुंबईत ओमायक्रानच्या रुग्णांची संख्या वाढत आहे आम्ही सरकारने घालून दिलेल्या नियमाचे तंतोतंत पालन करत आहोत.
त्यामुळे आम्ही संध्याकाळी पाच वाजेनंतर मैदानातून बाहेर पडू मैदानाबाहेर आणि स्वतःची राहण्याची व्यवस्था केली आहे असे एसटी महामंडळ कर्मचार्यांनी सांगितले पण पहाटे पाच वाजल्यापासून आझाद मैदानात पुन्हा आंदोलन आंदोलनाला सुरुवात होईल एसटी राज्य शासनात विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील राहील अशी भूमिका संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी मांडली.
• राज्यात ओमायक्रानची संख्या झपाट्याने वाढत आहे.
• मुंबईत कमी भागांमध्ये कोरोना पाझिटीव्ह रेट १० ते ११ टक्क्याच्या आसपास जाऊन आला आहे.
• मुंबईत सार्वजनिक ठिकाणी संध्याकाळी पाच ते पहाटे पाच वाजेपर्यंत जमावबंदी करण्यात आली.