आघाडी सरकार मधे कार्यकर्ते उपाशीच मात्र राज्यकर्ते तुपाशी दोन वर्षे झाली पण शासकीय समित्या वरील निवड अद्याप नाही

 


भोकर ( बातमीदार) दि.३ - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष होत आहेत. भक्ती मंत्री मुख्यमंत्री झाले परंतु पक्षाची धुरा व नेत्यांना निवडून आणण्यासाठी आपल्या जीवाची तमा न बाळगता लोकांमध्ये राहून कार्य करतात अशा या कार्यकर्त्यांना सत्तेच्या वाटेत ज्या शासकीय समित्या जिल्हा व तालुका पातळीवर असतात त्या अद्याप दिले नसल्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर नेते मंत्रिमंडळात परंतु कार्यकर्ते मात्र सतरंजीवर अशी अवस्था झाली असून राज्यकर्ते तुपाशी आणि कार्यकर्ते उपाशी अशी अवस्था आघाडी पक्षाच्या वतीने पक्षातील कार्यकर्त्यांची झाली आहे नेते हजार तयार होतील पण कार्यकर्ता असेल तर काय उपयोग राज्यातील सत्तेतील सर्वच पक्ष सत्ता येताच स्थानिक कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष करतात हा इतिहास आहे राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळून महा विकास आघाडी करून सत्ता मिळवली तिनी पक्षाने मंत्रीपद वाटून घेतले नेते मंत्री म्हणून कार्य करत आहेत आणि विविध विभाग सांभाळत आहेत परंतु या शासन करत या राज्यकर्त्यांना आपल्या कार्यकर्त्याचा विसर पडला आहे की काय असे दिसून येते खरेतर जिल्हा व तालुका पातळीवर अनेक शासकीय समिती आहेत या समितीवर स्थानिक पातळीवर सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे निवड केली जाते या समितीला सर्वसामान्य जनतेच्या जनतेशी निगडित असून त्यांचे प्रश्न या समितीअंतर्गत सोडल्या जाते यात रस कार्यकर्ता हा पक्षवाढीसाठी प्रयत्न करतो जिल्ह्याचे पालकमंत्री असतात ते या कार्यकर्त्याची सदस्य म्हणून निवड करतात विशेषता तालुका स्तरावर समन्वय समिती, रोजगार हमी समिती,पुरवठा समिती, शिक्षण समिती, आरोग्य समिती, वस्तीग्रह चौकशी समिती, दक्षता समिती, संजय गांधी निराधार समिती अशा अनेक समित्या तालुका स्तरावर आहेत. या सर्व समित्या व त्या या सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाते. सरकारमधील असलेले पालकमंत्री आपापल्या कामात गर्क असून याकडे दुर्लक्ष करित  असल्याने कार्यकर्ते्याची अवस्था ना घरका ना घाट का असी  झाली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्याची म्हणजे शिवसैनिकांना युती शासनाच्या काळात सुद्धा समित्यांची नेमणूक केली गेली नव्हती. सात वर्ष होत आहेत या समित्याची निवड कधी होईल याची वाट शिवसैनीकांना पाहावी लागत आहे शिवसेनेचे नेते, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख आदी याकडे लक्ष देत नाहीत आणि  शिवसैनिकांचं  मत ऐकून घेत नसल्याचे अनेक शिवसैनिकांचे म्हणणे आहे आजच्या परिस्थितीत सत्तेचे काही खरे नसल्याने शासकीय समिती यावर कार्यकर्त्यांची त्वरित नेमणुक  करून लोकांची कामे आणि पक्ष वाढीची संधी द्यावी अशी मागणी सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होत असताना दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post