भोकर (बातमीदार) दि.३ - भोक तालुक्यातील मौजे महागाव सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक संपन्न झाली असून आज या निकालात माजी चेअरमन श्री व्यंकटराव जाधव गटाने बाजी मारली आहे.यात सर्वसाधारण गटातुन नंदकुमार कौठेकर दतराम (९२), व्यंकटराव सोनबा जाधव (९४),जाधव विनायक मारोतराव (९३), सुर्यवंशी जयराम (४९),सावंत उत्तमराव गोपाळराव (७९),जाधव संजय रंगराव (४९),जिठ्ठेवार साईनाथ रामजी (४९),जाधव प्रताप विठ्ठल राव (५२) तर अनु सुच जाती जमाती मधुन कदम दिगंबर मरीबा (९३),इतर मागासवर्गीयातुन पांचाळ नरेश मोतीराम (९२) तर महिला वर्गातून कदम शोभाबाई बाळासाहेब (९८),जाधव धुरपताबाई साईनाथ (५३) असे उमेदवार निवडून आले आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवठाणा सेवा सहकारी संस्था संचालक निवडणूक बिनविरोध.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भोकर तालुक्यातील मौजे देवठाणा सेवा सहकारी संस्थांच्या संचालकांची निवडणूक बिनविरोध निवड झाली असल्याने यात रामराव देशमुख, राजकुमार अंगरवार,राव साहेब देशमुख, साहेबराव वाकोडे,मारोती पवार,व्यंकट भाले,शिवदास अंगरवाड,भागवत बत्तलवाड,मुकिंदराव शिंदे, श्यामराव जंगमे, वसंतराव जाधव,लच्हीराम जाधव हे बिनविरोध निवडून आले आहेत.याकामी दिलीपराज देशमुख, रंगराव देशमुख, मारोती अंगरवार, शंकरराव देशमुख आदींनी बिनविरोधसाठी प्रयत्न केले.