किनी येथे १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोवीड प्रतिबंधक लस देण्याच्या मोहीमेस प्रारंभ

 


भोकर (सुभाष नाईक यांचे कडुन) दि.४ -भोकर तालुक्यातील मौजे किनी येथे १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोवीड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस दिनांक 3 जानेवारी पासून प्रारंभ झाला आहे.  किनी येथे सदर वयोगटातील मुलांना कोवीड  प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला .पहिल्याच दिवशी लसीकरण मोहिमेत मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


काल  पासुन १५ ते १५ वयोगटातील मुलांना  कोवीड प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेस सुरुवात झाली आहे. हे अत्यंत आनंदाची बाब आहे. पहिल्याच दिवशी मुलांमध्ये लस टोचून  घेण्यासाठी उत्साह दिसून येत आहे .भारत सरकारच्या सूचनेनुसार मुलाच्या लसीकरणासाठी सर्व लसीकरण केंद्रावर उचित व्यवस्था करण्यात आलेली आहे. १५ ते १५ वयोगटातील मुले ही फिरणारी असतात त्यांना लस देण्याची अत्यंत गरज होती म्हणून शासनाने निर्णय घेतला आहे की ,या मोहिमेत पंधरा ते अठरा वयो गटातील सर्व मुलांनी सहभाग घेऊन आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना लस घेण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश शिंकोजीकर यांनी विशेष मेहनत घेतली आहे.तर आरोग्य केंद्रातील नर्स साबळे मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना लस देण्याचे काम केले.

Post a Comment

Previous Post Next Post