नांदेड जिल्ह्यातील नांदेड जिल्हा परिषद हायस्कूल बारड येथे माध्यमिक शिक्षक या पदावर कार्यरत असलेले उपक्रमशील प्रिय शिक्षक महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा सरचिटणीस श्री संदीप मस्के नाईक सर यांना सत्र 2021 चा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे.
मुदखेड तालुक्यातील मौजे बारड येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे सह शिक्षक श्री संदीप मस्के सर हे त्यांच्या गुण विषेसक व कलात्मक शैक्षणिक क्षेत्रातील त्यांनी केलेले सक्रिय योगदान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्ता वाढविण्यासाठी सातत्याने तळतळ असणारे हाडांचे शिक्षक श्री संदीप मस्के. याच त्यांच्या सर्व योगदानाबद्दल त्यांना नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने " जिल्हा उत्कृष्ट शिक्षक " पुरस्कार जाहीर झाला आहे.
श्री संदीप मस्के सरांनी इंग्रजी माध्यमाच्या जि.प. शाळेतिल १० वी वर्गाचा सेमीचा १०० टक्के निकाल लावण्यात मस्के सरांचं मोठं योगदान आहे.NTS परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, लेझीम कवायत,डंबेल्स कवायत,मानवी मनोरे,विज्ञान प्रदर्शन ,विवीध प्रकारचे देखावे, विवीध उपक्रम राबविण, स्पर्धा परिक्षेची तयारी करुन घेणे,NMMS परिक्षेची तयारी करुन घेऊन या परिक्षेत घवघवीत यश मिळविणे हाच त्यांचा उद्देश आहे.ते उत्कृष्ट निवेदन व चांगले सुत्रसंचालक म्हणून ते परिचित आहेत.जिल्हा स्तरीय ईतीहास विषयाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले.
असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या या शिक्षकांचे कार्य पाहून नांदेड जिल्हा परिषदेने सन २०२१-२०२२ च्या जिल्हास्तरीय " उत्कृष्ट शिक्षक " पुरस्कारासाठी विभागिय आयुक्त यांच्या मान्यतेने श्री संदीप मस्के यांची निवड केली असून नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने दि.२७ फेब्रुवारी २०२२ रोजी शहरातील कुसुम सभागृहात नांदेड जिल्हाचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
श्री संदीप मस्के नाईक सर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समस्त शिक्षक वर्ग,शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विलास देशमुख,व त्यांचे पदाधिकारी,कार्डचे ग्रामस्थ व पालक वर्गाशी आणि यशवंत सेनेचे मराठवाडा प्रमुख नागोराव बापू शेंडगे, शिवसेनेचे सुभाष नाईक किनीकर,राज हाके व यशवंत सेनेच्या पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.