बातमीदार भोकर/ माली पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडी या केंद्रीय यंत्रणेने नोटीस वा कसलीही माहिती न देता अचानक कारवाई करून अटक केली असल्याने याचा निषेध करत भोकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन दिले.
राष्ट्रवादीचे नेते प्रा. डॉ.यशपाल भिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष इंजी.विश्वभंर पवार यांच्या नेतृत्वाखाली दि.२५ फेब्रुवारी रोजी जिल्हा उपाध्यक्ष जवाजद्दीन बरबडेकर, शहराध्यक्ष डॉ.फेरोज इनामदार, पंकज देशमुख,तौफीक इनामदार ,मा.न.से.वकिल खैराती, आनंद पा.शिंधीकर,गणेश बोलेवार,रवि गेंटेवाड,सिद्धू पाटील,प्रशांत जाधव,अफरोज खा पठाण, डॉ.बोंदीरवाड,आनंद जाधव,विजु पाटील पोमनाळकर,सुनील जाधव,शे.नईम आदींच्या स्वाक्षरीने निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की,केंद्र सरकारने यंत्रणेचा गैरवापर करून राज्यात अस्थिरता निर्माण करत आहे.यातच आमच्या नेत्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करत आहेत.नवाब मलीक यांच्यावर खोटे दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे अन्यथा मोठे आंदोलन करावे लागेल असं पत्रकात म्हणत मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचे निषेध करण्यात आले.