फाल्गुन महिन्यातील कृष्णा चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीला महाशिवरात्रीला महाशिवरात्रीला भगवान भोलेनाथ शिवलिंगाच्या रुपात प्रगट झाल्याचे अनेक पौराणिक कथा मध्ये ऐकवायास मिळते.त्याच्या या शिवलिंग रुपाची भगवान विष्णू आणि ब्रम्हाजीनी पुजा केली होती.तेव्हापासुन आजपर्यंत महाशिवरात्रीच्या या शुभ दिवशी भगवान शंकराच्या शिवलिंगाची पुजा केली जाते.शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगात स्वत: भगवान शिव वास करतात असीही मान्यता आहे.
महाशिवरात्रीला शिवलिंगाची विषेश पुजा केली जाते.यात पंचगव्य वापरतात.पंचगव्य म्हणजे गायीचे दुध,तुप ,शेण गोमुत्र आणि दही लावुन शिवलिंगाचा अभिषेक करुन त्यांना दुध,दही,तुप,मध आणि साखर बेलाची पाणी,पांढरी फुले वाहून पुजा करतात.
प्रत्येक चंद्र महिन्यातील १४ वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आदिंचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखले जाते.वर्षभर येणाऱ्या बारा शिवरात्रीचे फेब्रुवारी/मार्च मध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीला सर्वात अधिक अध्यात्मिक महत्व आहे.म्हणुन "हर हर महादेव" भंब भंब भोले, भोलेनाथ भगवान की जय म्हणा पार्वती पत हरहर महादेव अशा घोषणा बांधीन या पावन महाशिवरात्रीला देतात.सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !