प्रतिनिधी / सुभाष भुतनर.
ठाकरे सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी उपोषण अखेर मागे घेतले मराठा समाजाच्या आरक्षण व विविध मागण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर राजे उपोषणाला बसले होते यावेळी या उपोषणाला विविध स्तरातून प्रचंड साथ मिळाली होती अखेर तीन दिवसानंतर त्यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि काँग्रेसचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी संभाजीराजेंची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी हमीपत्र दिले त्यानंतर संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले तसेच उपोषण सोडताना केलेल्या काशिनाथ सरकारने दाखवलेल्या तात्पुरत बद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेत्यांचे आभार मानले.
औरंगाबाद येथील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी सूचक वक्तव्य केलं ते म्हणाले की महा विकास आघाडीच्या कामाबाबत संभाजीराजे यांनी विश्वास व्यक्त केला हे आमच्यासोबत काम करणार असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितलं असल्याचे आम्ही देशमुख म्हणाले.